श्रीमद भागवत कथा

दुःखमय संसारात खरे सुख नाही, नित्यानंदाचा मार्ग भक्तीतच: भाईश्री रमेशभाई ओझा 

Srimad Bhagwat katha: संसारात सर्वत्र दुःख असताना आपण त्यालाच सुख समजतो, हीच माणसाची मोठी चूक आहे, असे परखड विचार मांडत प.पू. भाईश्री रमेशभाई ओझा यांनी श्रीमद भागवत कथेतून जीवनाचे गूढ उलगडले.

दुःखमय संसारात खरे सुख नाही, नित्यानंदाचा मार्ग भक्तीतच: भाईश्री रमेशभाई ओझा 

Srimad Bhagwat katha

श्रीमद भागवत कथेचा चौथा दिवस

हिंगोली (Srimad Bhagwat katha) : संसारात सर्वत्र दुःख असताना आपण त्यालाच सुख समजतो, हीच माणसाची मोठी चूक आहे, असे परखड विचार मांडत प.पू. भाईश्री रमेशभाई ओझा यांनी श्रीमद भागवत कथेतून जीवनाचे गूढ उलगडले.

येथील रामलीला मैदानावर रविवारी चौथ्या दिवशी कथेला (Srimad Bhagwat katha) सुरुवात होण्यापूर्वी मुख यजमान श्री नंदकिशोर शर्मा  तर दैनिक यजमान म्हणून रमेश चंद्र सावरमल बगडिया, पदमाबाई शिंदे, नवनीत राठोर यांच्या वतीने ग्रंथाची पूजा अर्चना करण्यात आली. त्यानंतर भजन गात कथेला सुरुवात झाली.

भाईश्री पुढे म्हणाले की, संसारात दिसणारे सुख हे अनित्य आहे. परिवारात अशांतता, कलह आणि तणाव निर्माण होणे हीच संसाराची खरी ओळख आहे. तरीही माणूस या दुःखमय अवस्थेलाच सुख समजून त्यात अडकून राहतो. त्यानंतर भाईश्री यांनी दोह्याच्या माध्यमातून ‘नित्यानंद’ या शाश्वत आनंदाचा अनुभव स्पष्ट केला. “जो आनंद सिंधू सुखराशी” या ओवीतून त्यांनी सांगितले की, खरा आनंद हा बाह्य वस्तूंमध्ये नसून अंतर्मनात आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनात आहे. सद्गुरूच माणसाला योग्य दिशा दाखवतात, असे त्यांनी अधोरेखित केले.

कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग यातील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, कर्ममार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला सुख हवे असते, तर भक्तीमार्गातील व्यक्तीला ‘आनंद’ हवा असतो. स्वर्गातील सुख उच्च असले तरी तेही अनित्यच आहे, मात्र भक्तीतून मिळणारा आनंद नित्य आणि शाश्वत असतो. जीवनातील विषमता मांडताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “एखादा माणूस झोपडीत जन्म घेतो तर दुसरा श्रीमंत घराण्यात का?” याचे उत्तर देताना त्यांनी कर्मसिद्धांत स्पष्ट करत प्रत्येकाच्या जीवनातील परिस्थिती ही त्याच्या कर्मांवर आधारित असल्याचे सांगितले. भागवत कथा हीच माणसाला योग्य मार्ग दाखवणारी आहे, असे सांगत त्यांनी प्रथम स्कंधातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे सविस्तर विवेचन केले.

यावेळी मौनी बाबांच्या कथेद्वारे (Srimad Bhagwat katha) खोट्या साधूंचा पर्दाफाश करत त्यांनी सांगितले की, काही लोक केवळ वेशभूषा आणि दिखावा करून लोकांना फसवतात व पैशावर डल्ला मारतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या साधूंमध्ये फरक ओळखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भागवत कथेतून दिलेल्या या जीवनमूल्यांनी उपस्थित भाविकांना आत्मचिंतनाचा नवा दृष्टिकोन दिला. यावेळी हजारो भविकांनी कथेचा लाभ घेतला. रात्री कृष्ण जन्म सोहळा पार पडला.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026