श्रीराम बांगर

स्वच्छता कामगारांनी वेळेत कामावर हजर राहावे, अन्यथा कठोर कारवाई

Shri Ram Bangar: नगरपरिषद गटनेते श्रीराम बांगर यांनी स्वच्छता कामगारांना वेळेवर कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

स्वच्छता कामगारांनी वेळेत कामावर हजर राहावे, अन्यथा कठोर कारवाई

Shriram Bangar

 

नगरपरिषद गटनेते श्रीराम बांगर यांचा इशारा

हिंगोली (Shriram Bangar) : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ नये आणि नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू नयेत, यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता कामगारांनी आपल्या निर्धारित वेळेत कामावर हजर राहून चोख कर्तव्य बजावावे. कामात कसूर करणाऱ्या किंवा विनाकारण दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा नगरपरिषद गटनेते श्रीराम बांगर (Shriram Bangar) यांनी दिला आहे.

वेळेचे पालन करणे अनिवार्य
शहराच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही कर्मचारी वेळेवर कामावर उपलब्ध राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीराम बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जनतेचे आरोग्य आमच्यासाठी प्राथमिकता आहे. जर स्वच्छता कर्मचारी वेळेवर आले नाहीत, तर कचरा साचून दुर्गंधी पसरते. त्यामुळे प्रत्येक कामगाराने बायोमेट्रिक हजेरी आणि नेमून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे," असे त्यांनी (Shriram Bangar) स्पष्ट केले.

नियमित देखरेख आणि पाहणी
स्वच्छता निरीक्षकांनीही प्रत्येक प्रभागात जाऊन कामगारांच्या उपस्थितीची नोंद घ्यावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहतील किंवा कामात टाळाटाळ करतील, त्यांच्यावर प्रशासकीय स्तरावर दंडात्मक तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही बांगर (Shriram Bangar) यांनी नमूद केले.

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही
पावसाळा जवळ येत असल्याने नाल्यांची सफाई आणि कचरा संकलन वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. शहरात कुठेही कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत याची काळजी स्वच्छता विभागाने घ्यावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीदरम्यान मुख्याधिकारी अरविंद मुंडे, उपाध्यक्ष अब्दुल माबुद बागवान, नगरसेवक कपिल खंडेलवाल, खली बांगर विशाल गोटरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

Municipal President Rekhatai Bangar: शहरांमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागून घडलेल्या घटनेत आगीत होरपळलेल्या जखमी नगरपालिका कर्मचार्‍यास प्रत्येकी एक लाखाची मदत नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम  बांगर

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026