आ.श्वेता महाले यांच्या भेटीतून माजी आ. रेखाताई खेडेकर यांचे नारी शक्ती वंदन विधेयकाला जाहीर समर्थन

नारीशक्तीला घटनात्मक बळ देणारे ऐतिहासिक नारीशक्ती वंदन विधेयक उद्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत संसदेमध्ये मांडले जाणार असून, या विधेयकाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आ.श्वेता महाले यांच्या भेटीतून माजी आ. रेखाताई खेडेकर यांचे नारी शक्ती वंदन विधेयकाला जाहीर समर्थन

Shweta Mahale Patil

नारीशक्तीला बळ देणाऱ्या दोन नेतृत्वशील स्त्रियांची भावनिक भेट 

चिखली (Shweta Mahale Patil) : नारीशक्तीला घटनात्मक बळ देणारे ऐतिहासिक नारीशक्ती वंदन विधेयक उद्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत संसदेमध्ये मांडले जाणार असून, या विधेयकाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षामार्फत 966717333 हा विशेष क्रमांक जारी करण्यात आला असून, देशातील तमाम नागरिकांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मिस कॉल देऊन नारीशक्तीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या पवित्र भूमीत चिखली विधानसभा मतदारसंघात एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग घडला. विद्यमान आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी या मतदारसंघाच्या तीन वेळा आमदार राहिलेल्या माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर यांची भेट घेतली.

ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर स्त्री नेतृत्वाच्या सातत्याची आणि सशक्त परंपरेची साक्ष देणारी ठरली. ज्या मतदारसंघात महिलांना कोणतेही आरक्षण नसताना, प्रस्थापितांना पराभूत करून या दोन्ही महिला नेत्यांनी लोकप्रतिनिधित्व केले त्याच भूमीत आज त्या पुन्हा एकत्र येऊन नारीशक्तीच्या भविष्यासाठी उभ्या ठाकल्या.योगायोग म्हणजे दोघींनीही भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे.

आमदार श्वेता महाले पाटील यांनी नारीशक्ती वंदन विधेयकाची सविस्तर माहिती देत माजी आमदार रेखाताई खेडेकर यांचे खुले समर्थन मिळवले. या विधेयकामुळे विधानसभांमध्ये आणि संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार असून, स्त्रियांची संख्या आणि प्रभाव दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.

राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील या दोन कर्तृत्ववान महिलांची भेट म्हणजे स्त्रीशक्तीच्या उभारणीचा प्रेरणादायी क्षण ठरला. स्वतः स्त्रिया असूनही कोणत्याही आरक्षणाशिवाय मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांनी आज नव्या पिढीतील महिलांसाठी मार्ग अधिक सुलभ करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी आमदार श्वेता महाले पाटील यांनी राज्यभरातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “नारीशक्ती अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने या विधेयकाला समर्थन द्यावे. हा केवळ महिलांचा नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा मार्ग आहे.”

नारीशक्तीच्या सन्मानासाठी आणि सबलीकरणासाठी उचललेले हे पाऊल देशाच्या लोकशाहीला अधिक समृद्ध करणारे ठरणार आहे आणि बुलढाण्यातील या दोन नेतृत्वशील स्त्रियांची भेट त्याचीच सशक्त सुरुवात मानली जात आहे..

संबंधित सामग्री

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

MLA Shweta Mahale Patil: शेतकऱ्यांची व्यथा केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत..

Sep 24, 2026
पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

MLA Shweta Mahale Patil: शेतकरी वर्षभर कष्ट करून पिकाची काळजी घेतो; मात्र ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने दगा दिल्याने त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.पिकं करपली, शेतकरी हवालदिल

Sep 20, 2026
शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार घेऊन देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. श्वेता महाले पाटील

शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार घेऊन देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: “छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा विचार सदैव स्मरणात ठेवूनच देवाभाऊंचे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात जनतेला आधार

Sep 18, 2026
रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

चिखलीतील रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या वाटचालीचा गौरव, सहकारातील विश्वास आणि ठेवीदारांच्या हितावर मान्यवरांचे भाष्य.

Sep 14, 2026
करुणा आणि समतेच्या विचारांना नवी दिशा देण्याचे काम भगवान गौतम बुद्ध यांनी केले - आ. श्वेता महाले

करुणा आणि समतेच्या विचारांना नवी दिशा देण्याचे काम भगवान गौतम बुद्ध यांनी केले - आ. श्वेता महाले

भादोला येथे बुद्ध रश्मी महाविहारच्या वतीने नवीन बुद्धविहाराच्या भूमिपूजन सोहळ्याला आमदार श्वेता महाले पाटील उपस्थित राहिल्या. समता, करुणा, बंधुता आणि मानवतेच्या विचारांना त्यांनी अभिवादन केले.

Sep 12, 2026