Snake Bite

मिरची लागवड करताना विषारी सापाचा दंश; २३ वर्षीय शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कन्नड तालुक्यातील शिवराई शिवारात शेतीची कामे सुरू असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका विवाहित शेतकरी महिलेचा विषारी सापाच्या दंशामुळे मृत्यू झाला.

मिरची लागवड करताना विषारी सापाचा दंश; २३ वर्षीय शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Snake Bite

कन्नड तालुक्यातील शिवराई शिवारातील घटना; दोन लहान मुलांवरून आईचे छत्र हरपले

हतनूर (Snake Bite) : कन्नड तालुक्यातील शिवराई शिवारात शेतीची कामे सुरू असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका विवाहित शेतकरी महिलेचा विषारी सापाच्या दंशामुळे मृत्यू झाला. मिरचीची लागवड करत असताना मल्चिंग पेपरखाली लपून बसलेल्या सापाने दंश केल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना सोमवारी (दि. २२) दुपारी घडली.

मृत महिलेचे नाव रोहिणी सतीश नागोडे (वय २३, रा. शिवराई, ता. कन्नड) असे आहे. त्या सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजता आपल्या शेतात मिरचीची लागवड करत होत्या. याचवेळी मल्चिंग पेपरखाली दडलेल्या विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंशानंतर त्या बेशुद्ध पडल्या.

घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कन्नड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

रोहिणी नागोडे यांच्या पश्चात पती, चार वर्षांचा मुलगा, अकरा महिन्यांचे बाळ तसेच सासू-सासरे असा परिवार आहे. मंगळवारी (दि. २३) सकाळी ११ वाजता शिवराई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे दोन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले असून संपूर्ण शिवराई गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026