Social Service

हिंगोलीच्या आडगाव फाट्यावर वारकरी भक्तांसाठी फराळ वाटप आणि मोफत आरोग्य शिबिर

पंढरपूरच्या पायी वारीला निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी हिंगोली जिल्ह्यातील आडगाव फाटा येथे यंदाही सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोलीच्या आडगाव फाट्यावर वारकरी भक्तांसाठी फराळ वाटप आणि मोफत आरोग्य शिबिर

Social Service

हिंगोली : पंढरपूरच्या पायी वारीला निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी हिंगोली जिल्ह्यातील आडगाव फाटा येथे यंदाही सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी आडगाव फाटा, ता. जि. हिंगोली येथे फराळ वाटप आणि मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. वारीच्या मार्गावर थकलेल्या वारकऱ्यांना विश्रांती, अल्पोपहार आणि आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सारिकाताई चांदणे महिला मंडळ आणि मुनीर पठाण सर मित्र मंडळ, आडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी सर्व वारकऱ्यांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी बोलताना मुनीर पठाण म्हणाले, "वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून माणुसकीची आणि सेवेची शिकवण देणारी आहे. त्याच भावनेतून दरवर्षी या ठिकाणी फराळ वाटप आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते."

या आरोग्य शिबिरात डॉक्टरांच्या पथकामार्फत मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी तसेच आवश्यक औषधोपचार करण्यात येणार आहेत. उन्हाच्या कडाक्यात पायी प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच सर्व वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटपही करण्यात येणार आहे.

आयोजकांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मुनीर पठाण यांच्या पुढाकाराने आडगाव परिसरात हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी लीन होऊन पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना या सेवेतून निश्चितच ऊर्जा आणि दिलासा मिळेल, असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026