ST NCMC कार्ड

महिला आणि ज्येष्ठांच्या एसटी सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती अखेर लांबणीवर

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २०२६ पासून NCMC कार्ड

महिला आणि ज्येष्ठांच्या एसटी सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती अखेर लांबणीवर

ST NCMC Card

 

३० सप्टेंबरपर्यंत जुन्याच पद्धतीने प्रवास करता येणार

हिंगोली (ST NCMC Card) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २०२६ पासून NCMC कार्ड असल्याशिवाय सवलतीत प्रवास करता येणार नाही, असे महामंडळाने जाहीर केले होते. मात्र प्रवाशांना कार्ड मिळण्यास होणारा विलंब आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता या सक्तीला मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक यांनी सर्व विभाग नियंत्रकांना पत्रा द्वारे दि. २ सप्टेंबर रोजी सूचना दिल्या आहेत.

महामंडळाकडून RuPay ON THE GO enabled with NCMC कार्डचे वाटप Ebix Cash Ltd आणि NSDL Payments Bank यांच्या माध्यमातून केले जात आहे. हे वाटप १६ फेब्रुवारी २०२६ पासून राज्यातील सर्व आगार आणि बसस्थानकांवर सुरू आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या १५ जून रोजी झालेल्या बैठकीत १ ऑगस्टपासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला या सवलत प्रकारांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याची मुदत नंतर १ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

परंतु प्रत्यक्षात कार्ड नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना कार्ड मिळालेले नाही आणि NCMC प्रणालीवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याने सवलतीचे तिकीट देण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांना दिलासा दिला आहे. ज्या महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट आरक्षित केले आहे त्यांना विशेष बाब म्हणून NCMC कार्ड नसतानाही सवलतीत प्रवास करू दिला जाणार आहे. तसेच ज्यांनी कार्डसाठी नोंदणी केली आहे परंतु अद्याप कार्ड प्राप्त झालेले नाही अशा प्रवाशांनी नोंदणीची पावती दाखविल्यास त्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मॅन्युअल पद्धतीने सवलतीचे तिकीट दिले जाणार आहे.

श्रावण महिना आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तीर्थदर्शन योजने अंतर्गत सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांमधील प्रवाशांना १२ सप्टेंबर पर्यंत तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ज्येष्ठ आणि महिला प्रवाशांनाही NCMC शिवाय सवलत मिळणार आहे. याशिवाय सर्व्हरवरील तांत्रिक अडचणीमुळे १४ सप्टेंबर पर्यंत सर्वच सवलतधारक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मॅन्युअल तिकीटावर प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे सक्रिय NCMC कार्ड आहे त्यांना मात्र कार्डद्वारेच सवलतीचे तिकीट घ्यावे लागणार आहे.

टैग्स: ST NCMC Card

संबंधित सामग्री

एसटीचे संपूर्ण भाडे भरून लाडकी बहीण सासरी!

एसटीचे संपूर्ण भाडे भरून लाडकी बहीण सासरी!

ST NCMC Card: महामंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. यात महिला व वृद्धांना प्रवासाची सवलत हवी असेल तर 'एन सी एम सी' कार्ड असणे अनिवार्य आहे. जर हे कार्ड नसेल तर बसच्या प्रवासामध्ये मिळणारी सवलत

Sep 01, 2026
एस.टी.च्या एनसीएमसी कार्डला 'तांत्रिक अडचणीं'चा ब्रेक; प्रवासी संघटनांचा विरोध

एस.टी.च्या एनसीएमसी कार्डला 'तांत्रिक अडचणीं'चा ब्रेक; प्रवासी संघटनांचा विरोध

ST NCMC Card: एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी (NCMC) कार्ड प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असली, तरी ग्रामीण भागात या प्रणालीला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना

Sep 01, 2026
उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीच्या प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दि. १ सप्टेंबर २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सवलत

Aug 31, 2026