एसटी एनसीएमसी कार्ड

एसटीचे संपूर्ण भाडे भरून लाडकी बहीण सासरी!

ST NCMC Card: महामंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. यात महिला व वृद्धांना प्रवासाची सवलत हवी असेल तर 'एन सी एम सी' कार्ड असणे अनिवार्य आहे. जर हे कार्ड नसेल तर बसच्या प्रवासामध्ये मिळणारी सवलत

एसटीचे संपूर्ण भाडे भरून लाडकी बहीण सासरी!

ST NCMC Card

 

एनसीएमसी कार्ड 'टॉप अप' होईना; महिला प्रवाशांची गैरसोय!

बी.जी.शेख
औसा (ST NCMC Card) :
नुकतेच महामंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. यात महिला व वृद्धांना प्रवासाची सवलत हवी असेल तर 'एन सी एम सी' कार्ड असणे अनिवार्य आहे. जर हे कार्ड नसेल तर बसच्या प्रवासामध्ये मिळणारी सवलत मिळणार नसल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. एक सप्टेंबर पासून हे परिपत्रक लागू झाले आहे. बस प्रवासासाठी मिळणाऱ्या सवलतीच्या कार्डाबाबत मात्र महिलांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे.

कार्ड (ST NCMC Card) असूनही काही ठिकाणी ते स्वीकारले जात नसल्याने महिला प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ज्यांच्याकडे कार्ड व त्यात टाॅप अप (रक्कम भरलेली) आहे, अशा महिलांना प्रवासात सवलत मिळत आहे. संबंधित यंत्रणेकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र कार्डच्या वापराबाबत स्पष्टता नसणे, तांत्रिक अडचणी किंवा काही ठिकाणी कार्ड स्वीकारले न जाणे, यामुळे महिलांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी दिवशी दिसून आले. औसा शहरात प्रवास करून आलेल्या सर्वच महिलांनी संपूर्ण भाडे भरून प्रवास केल्याचे दैनिक 'देशोन्नती'शी बोलताना सांगितले.

या (ST NCMC Card) प्रकारामुळे प्रवास करणाऱ्या महिलांना आर्थिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.संबंधित परिवहन विभागाने याची तातडीने दखल घेऊन कार्डची सुविधा सुरळीत करावी आणि महिलांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. महिला प्रवाशांच्या सोयीसाठी शासनाने सुरू केलेली योजना प्रत्यक्षातही सुरळीतपणे लागू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रत्येक प्रवाशाकडे मोबाईल शक्य आहे का?
दरम्यान, नवे नवीन नियम आणून आम्हाला या सवलती पासून दूर केले जात आहे. आमच्याकडे मोबाईल नाही, त्यावरती ओटीपी येतो म्हणे, तो कसला असतो? या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत. मग आम्ही या सवलतीचा फायदा कसा घ्यावा? असाही प्रश्न येथील उपस्थित प्रवाशांनी केला. सुरुवातीला आधार कार्ड दाखवले की या योजनेचा लाभ मिळत होता. परंतु हे बंद केल्याने आम्हाला खूप त्रास होत आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया येथील उपस्थित नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. ही यंत्रणा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. यासाठी शासनाने कार्डसाठी मुदत वाढवून द्यावी, अ अशी मागणी ही यावेळी अनेक प्रवाशांनी केली.

टॉप अप होत नसल्याची तक्रार
अनेक महिला व वृद्ध संबंधित कार्डचे टॉप-अप करण्यासाठी गेल्यानंतर ते होत नसल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले. आम्ही यासंदर्भात वरिष्ठांना कळविले आहे, असे त्यांनी सांगितले.

पूर्ण भाडे भरावे लागले!
तिकिटाचे मोजकेच पैसे घेऊन घरून निघाले होते. लातूर ते औसा बसमध्ये प्रवास करताना संपूर्ण तिकीट द्यावे लागले. कितीही विनवण्या केल्या, तरीही वाहक यांनी तक्रार ऐकली नाही. पूर्ण भाडे वसूल केल्यानंतर तिकीट देण्यात आले.
- सुरेखा रमेश खैरमुडे, प्रवासी महिला औसा

महिला वाहक असतानाही आमच्या समस्या समजून घेतल्या नाहीत. वारंवार त्यांना आमचे कार्ड दाखवले तरीही माझ्याकडून संपूर्ण भाडे वसूल केले गेले. त्याचा आम्हाला खूप त्रास झाला.
- आनंदी देशपांडे, प्रवासी महिला औसा

कार्ड साठी तोबा गर्दी!
सवलतीचे कार्ड (ST NCMC Card) मिळावे यासाठी आधीच ज्यांनी नोंदणी केली होती अशा प्रवाशांची गर्दी औसा येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात दिसून आली. ज्या प्रवाशांचे टॉप-ऑप नाही, असेही प्रवासी पैसे घेऊन आले होते. परंतु त्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे ते होत नसल्याचे येथील कर्मचारी यांनी सांगितले. यामुळे अनेकांना संपूर्ण भाडे देऊन प्रवास करावा लागला.

टैग्स: ST NCMC Card

संबंधित सामग्री

महिला आणि ज्येष्ठांच्या एसटी सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती अखेर लांबणीवर

महिला आणि ज्येष्ठांच्या एसटी सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती अखेर लांबणीवर

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २०२६ पासून NCMC कार्ड

Sep 02, 2026
एस.टी.च्या एनसीएमसी कार्डला 'तांत्रिक अडचणीं'चा ब्रेक; प्रवासी संघटनांचा विरोध

एस.टी.च्या एनसीएमसी कार्डला 'तांत्रिक अडचणीं'चा ब्रेक; प्रवासी संघटनांचा विरोध

ST NCMC Card: एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी (NCMC) कार्ड प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असली, तरी ग्रामीण भागात या प्रणालीला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना

Sep 01, 2026
उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीच्या प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दि. १ सप्टेंबर २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सवलत

Aug 31, 2026