चिखली मध्ये श्री शिवाजी विद्यालयात मोफत उन्हाळी छंद शिबिरास प्रारं

स्थानिक श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चिखली येथे २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत मोफत उन्हाळी छंद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

चिखली मध्ये श्री शिवाजी विद्यालयात मोफत उन्हाळी छंद शिबिरास प्रारं

Summer Camp 2026

चिखली (Summer Camp 2026) : स्थानिक श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चिखली येथे २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत मोफत उन्हाळी छंद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य डॉ. अनंतकुमार चेके होते, तर उद्घाटक म्हणून नगर परिषद चिखलीच्या उपाध्यक्ष वैशालीताई खेडेकर उपस्थित होत्या. यावेळी आजीवन सभासद व शाळा समिती सदस्य मधुकरराव पाटील, नगर परिषद पाणीपुरवठा समितीचे सभापती दत्ताभाऊ सुसर, नगरसेविका ज्योतीताई वाळेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, शंतनूभाऊ पाटील, श्री शिवाजी अभ्यास शाळेचे मुख्याध्यापक सुनील घायाळ, उपप्राचार्य गजेंद्रसिंह राजपूत, पर्यवेक्षक जयेश सावजी, शिक्षक प्रतिनिधी गजाननराव वायाळ, ज्येष्ठ शिक्षक करवंदे सर, चौथे मॅडम व अंभोरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना धनवे मॅडम यांनी सांगितले की, शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी छंद शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कला व हस्तकला, नृत्य, स्वयंसंरक्षण, क्रीडा, रांगोळी स्पर्धा तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी मेडिटेशनसारखे उपक्रम मोफत राबविण्यात येत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो व त्यांच्यात नवीन उर्जा निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.

​​​​​​​

यानंतर वैशालीताई खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री शिवाजी विद्यालय हे उपक्रमशील विद्यालय असून येथे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन दिले जाते, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनंतकुमार चेके यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमधून आनंदासोबतच सर्वांगीण विकास साधता येतो, असे सांगितले. या शिबिरात डान्सिंग योगा, मेडिटेशन, इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन, मैदानी खेळ, रांगोळी, कराटे तसेच आर्ट अँड क्राफ्ट यांसारख्या प्रशिक्षणांचा समावेश असल्याची माहिती देत त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमानंतर दररोज विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाडेकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिपाली पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षिका तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

Sep 30, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026
दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

Polytechnic Engineering Admission: दहावीनंतर बारावी आणि अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

Sep 29, 2026
शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

मिसाळवाडी शाळेतील शिक्षक नियुक्तीवरून वाद चिघळला. ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून, प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sep 19, 2026
SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी SET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असून वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाला आहे.

Sep 15, 2026