Tadiapar Action

गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; २७ सराईत गुंडांना तडीपार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २७ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; २७ सराईत गुंडांना तडीपार

सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कारवाई; खून, मारामारी, चोरी, विनयभंग आणि अवैध दारूविक्रीसह गंभीर गुन्ह्यांची नोंद

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २७ आरोपींना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि सणाच्या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तडीपार करण्यात आलेल्या आरोपींविरोधात खून, मारामारी, गुन्ह्याचा कट रचणे, चोरी, तोडफोड, जुगार, शिवीगाळ, विनयभंग आणि बेकायदेशीर दारू विक्री यांसारख्या विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

या कारवाईत वानवडी, वाघोली, भारती विद्यापीठ, चंदननगर, लोहगाव, विमानतळ आणि लोणीकंद या सात पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांकडून आरोपींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची यादी :

१. वानवडी – मुसा अबू शेख (वय २५, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर)

२. वानवडी – अशोक महादेव राऊत (वय २८, रा. सुरक्षानगर, हिंगणे मळा, हडपसर)

३. वाघोली – दत्ता रंगनाथ गायकवाड (वय २९)

४. वाघोली – महेश देवराम लोंढे (वय २६)

५. वाघोली – रिना पवन राजपूत (वय ३५)

६. भारती विद्यापीठ – अजिंक्य संतोष काळे (वय २४, रा. आंबेगाव पठार)

७. भारती विद्यापीठ – सरफराज समीर शेख ऊर्फ डर (वय २४, रा. एसआरए वसाहत, कात्रज)

८. भारती विद्यापीठ – महेश ऊर्फ बंटी विनायक चव्हाण (वय २२, रा. खोपडेनगर, कात्रज)

९. विमानतळ – अनिल साहेबराव वीर (वय ४७, रा. इंदिरानगर, बर्मासेल)

१०. विमानतळ – मुकेश बजरंग बुरुंगे (वय ३६, रा. लेन नं. १०, विमाननगर, पुणे)

११. विमानतळ – सागर गौतम अवधूत (वय २९, रा. रामवाडी)

१२. विमानतळ – सुमित ऊर्फ बंटी रणजित गायकवाड (वय २५, रा. रामवाडी)

१३. लोहगाव – गुलाम ऊर्फ गुडडू नवरूलहक मुस्ताफा खान (वय ५०, कलवड वस्ती, लोहगाव)

१४. लोहगाव – शुभम सुखदेव सोनवणे (वय ३८, बीअर फोर्स रोड, लोहगाव)

१५. लोहगाव – दीपक तुकाराम गायकवाड (वय ४६, लोहगाव)

१६. लोहगाव – अतुल गौतम ढोके (वय २५, रा. कलवड वस्ती, लोहगाव)

१७. लोहगाव – आरती संजय साठे ऊर्फ जमदाडे (वय ४३, रा. धानोरी, लोहगाव)

१८. लोणीकंद – सागर राजू ऊर्फ राजेंद्र भालसिंग (वय ३२, रा. कोलवडी, हवेली)

१९. लोणीकंद – सचिन किसन शिंदे (वय ३९, रा. लोणीकंद)

२०. लोणीकंद – हर्षद कुमार शिंदे (वय २४, रा. लोणीकंद, हवेली)

२१. लोणीकंद – रोशन कुमार साहू (वय २४, रा. भावडी, हवेली)

२२. लोणीकंद – अंजिक्य दादासाहेब मस्कुटे (वय २७, रा. खामगाव बु., ता. दौंड)

२३. लोणीकंद – संतोष गोविंद जाधव (वय १८, रा. लोणीकंद)

२४. लोणीकंद – प्रकाश बाबूराव शिवभक्ते (वय २५, रा. खडकआळी, लोणीकंद)

२५. चंदननगर – सुमित सुशील बोरगे (वय ३०, रा. वडगावशेरी)

२६. चंदननगर – गणेश जालिंदर गलांडे (वय ३७, रा. आनंद पार्क, वडगावशेरी)

२७. चंदननगर – अतिश उमेश शिंगरे (वय २३, रा. धानोरी)

पोलिसांच्या या कारवाईमुळे गणेशोत्सवाच्या काळात संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यास मदत होणार असून, शहरातील शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जात आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात 1,801 चॅट्सचा डेटा, 11 डिलीट WhatsApp चॅट्स आणि लोहगडवरील फोटोंचा तपास; 5,053 पानी आरोपपत्रात डिजिटल पुरावे.

Oct 03, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026