देशोन्नतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मालमत्ता कर वाढ स्थगित

नगर परिषदेने मालमत्ता करात केलेल्या प्रचंड आणि अवाजवी वाढीविरोधात शहरातील १६ विविध संस्था, संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

देशोन्नतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मालमत्ता कर वाढ स्थगित

Tax Protest

खामगाव (Tax Protest) : नगर परिषदेने मालमत्ता करात केलेल्या प्रचंड आणि अवाजवी वाढीविरोधात शहरातील १६ विविध संस्था, संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) यांनी हा मुद्दा लावून धरत व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत केंद्रीय मंत्री तथा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत या करवाढीला स्थगिती मिळवून देण्याची ठाम मागणी करण्यात आली होती.

या मागणीनंतर प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मालमत्ता कर वाढीला स्थगिती मिळवून दिली आहे. नगर परिषदेकडून करण्यात आलेली करवाढ ही काही टक्क्यांमध्ये नसून तब्बल आठ ते पंधरा पट इतकी असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. ही वाढ रद्द करण्यासाठी शहरात आंदोलन उभारण्यात आले होते.

या करवाढविरोधी आंदोलनात दैनिक ‘देशोन्नती’नेही महत्त्वाची भूमिका बजावली. वृत्तपत्राने वेळोवेळी सविस्तर बातम्या प्रसिद्ध करून या प्रश्नाला व्यापक स्वरूप दिले. त्यामुळे या चळवळीला अधिक बळ मिळाले, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, करवाढीला स्थगिती मिळाल्यानंतर खामगावकरांनी प्रतापराव जाधव, एकनाथ शिंदे तसेच स्थानिक शिवसेना (शिंदे गट) नेते अॅड. अमोल अंधारे, तालुका प्रमुख राजेंद्र बघे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. यासोबतच दैनिक ‘देशोन्नती’चेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, ‘देशोन्नती’ने प्रकाशित केलेल्या १२ महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणे एकत्र करून शहरात होर्डिंगवर प्रदर्शित करण्यात आली आहेत. या माध्यमातून आंदोलनात वृत्तपत्राच्या योगदानाची दखल घेतली गेली असून, जनआंदोलनातील प्रभावी माध्यम म्हणून ‘देशोन्नती’ने आपले स्थान पुन्हा अधोरेखित केले आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026