सागवान लाकडाची अवैध कटाई  करणार्‍या  तिन व्यक्तीवर वनविभागाची कारवाई

अवैध रित्या बिजा व सागवान लाकडाची कटाई करताना तिन व्यक्तींना अटक केली आहे.

सागवान लाकडाची अवैध कटाई  करणार्‍या  तिन व्यक्तीवर वनविभागाची कारवाई

Teak Wood Cutting

रांगी (Teak Wood Cutting) : धानोरा तालुक्यातील मेंढा गावातील अवैध रित्या बिजा व सागवान लाकडाची कटाई करताना तिन व्यक्तींना अटक करून ३० मार्च पर्यंत वन कोठडी घेतल्याची  घटना ताजी असतानाच, वनाधिकार्‍यांच्या गस्ती दरम्यान निमगाव (रांगी) च्या जंगलातून अवैधरित्या सागवान लाकडाची कटाई करताना आढळलेल्या तीन आरोपींना वनाधिकार्‍यांनी अटक केल्याची घटना निमगाव गावालगत घडली.

अविनाश एकनाथ गावळे, आनंदराव चिन्नू पदा, पितांबर मसरु दुगा तिघेही रा. निमगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २ दिवसाची वनकोठडी ठोठावण्यात आली. शनिवार २८ मार्च रोजी  सकाळी  सहाय्यक वनसंरक्षक यादव   यांच्या मार्गदर्शनात रांगी उपक्षेत्रातील क्षेत्रसहाय्यक  के. व्ही. ढवळे, वनरक्षक एम. एन. कोहळे, एम. एम. राउत, एस. के. हलामी गस्तीवर असताना कक्ष क्रमांक ४३६ मध्ये अवैध रित्या सागवान लाकडाची कटाई करतांना आरोपी आढळले . या गुन्ह्याबाबत भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीनही आरोपींना ३० मार्च पर्यंत वनकोठडी मिळाली असून पुढील तपास गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक आर्या व्हि. एस. सहाय्यक वनसंरक्षक  महेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात उत्तर धानोरा परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.कायते यांचे अधिनिस्त वनकर्मचारी करीत आहेत.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
ओडिशाच्या जंगलात सापडले पाच ऑरंगुटान; तस्करीचा संशय

ओडिशाच्या जंगलात सापडले पाच ऑरंगुटान; तस्करीचा संशय

Odisha Orangutan Trafficking: ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील जंगल परिसरात पाच तरुण ऑरंगुटान आढळून आल्याने वन विभागासह वन्यजीवप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. भारतात नैसर्गिकरित्या आढळत नसलेल्या

Sep 10, 2026
इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

चिखली तालुक्यातील इसरूळ परिसरातील शिवारात वाघ किंवा बिबट्यासदृश हिंस्र वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sep 05, 2026
मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या; वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या; वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

मोकळ्या जंगलात मुक्तपणे वावरणारा बिबट्या अचानक संरक्षक जाळीत अडकला. बाहेर पडण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड पाहून परिसरात चिंता निर्माण झाली.

Aug 29, 2026
मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

सौ. आरती राजेश वानखडे यांची तातडीने घटनास्थळी धाव; मृताच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याची ठाम मागणी

Aug 27, 2026