Tiranga Rally

मलकापुरात तिरंग्याची शान, देशभक्तीचा जल्लोष!

“तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे.

मलकापुरात तिरंग्याची शान, देशभक्तीचा जल्लोष!

Tiranga Rally

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली; आमदार चैनसुख संचेतींच्या ओजस्वी विचारांनी वेधले सर्वांचे लक्ष

मलकापूर : “तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या त्यागाची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे,” अशा भावपूर्ण शब्दांत आमदार चैनसुख संचेती यांनी आपले विचार मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता वीर संजयसिंह भिकमसिंह राजपूत स्मारकास अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण मलकापूर शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तिरंग्यांनी सजलेले रस्ते आणि देशभक्तीच्या घोषणांनी भारावलेले वातावरण हे रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.

आमदार संचेतींच्या विचारांनी वेधले लक्ष

रॅलीदरम्यान आमदार चैनसुख संचेती यांनी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. देशाची एकता आणि अखंडता मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या ओजस्वी आणि राष्ट्रप्रेमाने भारलेल्या विचारांनी रॅलीतील सहभागींचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

मलकापूरवासीयांकडून रॅलीवर पुष्पवृष्टी

रॅली मुख्य मार्गावरून पुढे जात असताना शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी मलकापूरवासीयांनी तिरंगा रॅलीवर फुलांचा वर्षाव करून देशभक्तीची भावना व्यक्त केली. महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभाग घेतला.

या भव्य रॅलीमध्ये माजी सैनिक, पोलीस प्रशासन, शासकीय अधिकारी, आमदार तसेच सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रप्रेमाचा संदेश दिल्याने रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान

रॅली जयस्तंभ चौकात पोहोचल्यानंतर आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सेवानिवृत्त सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या शौर्याला सलाम करण्यात आला.

यानंतर जयस्तंभ चौक येथे राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त सैनिक, शाळकरी मुले-मुली, शिक्षक, शिक्षिका, मोहन भाऊ शर्मा, चंद्रकांत वर्मा, मिलिंद डवले, संतोष बोंबटकर, रामा मेहसरे व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026