ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ट्रॅक्टरचे हेड अंगावर पडल्याने त्याखाली दबून या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Tractor Acciden

वसमत तालुक्यातील अकोली शिवारातील घटना

वसमत (Tractor Acciden) : वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ट्रॅक्टरचे हेड अंगावर पडल्याने त्याखाली दबून या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

वसमत तालुक्यातील अकोली येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली माधव कदम (वय १८ वर्ष) रविवारी सकाळी ट्रॅक्टर घेऊन घराकडे येत असताना अकोलीच्या कालव्याच्या रस्त्यावरून येताना ट्रॅक्टर ट्रॉलीसह कालव्यात कोसळला. या अपघातात ज्ञानेश्वर याच्या अंगावरच ट्रॅक्टरचे हेड पडल्यामुळे तो त्याखाली दबला गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

परिसरातील शेतकऱ्यांनी ही घटना पाहताच तात्काळ मदतीला धाव घेतली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढले व त्याखाली दबलेला ज्ञानेश्वर याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

अल्पभूधारक शेतकऱ्याचा तरुण मुलगा अपघातात दगावल्याने मोठी शोककळा पसरली आहे. तो एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर तसेच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंचनामा व इतर सोपस्कार करून पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026