औंढा नागनाथ ट्रक अपघात

औंढा नागनाथ बसस्थानकाजवळ ट्रकचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघात

Aundha Nagnath Truck Accident: 31 मे रोजी औंधा-नागनाथ रोडवर ट्रकचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला. ट्रकने एक दुचाकी व कारला धडकले, जखमी झालेल्या चार जणांमध्ये एक गंभीर जखमी.

औंढा नागनाथ बसस्थानकाजवळ ट्रकचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघात

Aundha Nagnath Truck Accident

 

कार नुकसान, कार मधील एक गंभीर तीन किरकोळ जखमी

औंढा नागनाथ (Aundha Nagnath Truck Accident) : शहरातील बसस्थानकाजवळ औंढा - हिंगोली रोडवर नगरपंचायत कमान समोर ट्रकचे अचानक ब्रेक फेल होऊन रिव्हर्स आला .यामध्ये एक दुचाकी व कार चपेट मध्ये येऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर तर तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना  ३१ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून सुदैवाने यामध्ये मोठी दुर्घटना टाळली आहे. ट्रक क्रमांक एम एच ४० एन ५२१८ हा ट्रक परभणीकडून हिंगोली कडे जात होता .यादरम्यान औंढा नागनाथ शहरातील बस स्थानकासमोर वरदळीच्या ठिकाणी ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले आणि ट्रक पाठीमागे रिव्हर्स झाला. असे ट्रकचालक साहेबराव सोनवणे वय 52 यांनी सांगितले. 

यादरम्यान (Aundha Nagnath Truck Accident) ट्रकने एक दुचाकी व फुटकळ आंबे विक्रेते यांच्या गाड्याला टक्कर देऊन कार क्रमांक एम एच १४ जीडी ७७५९ या कारला धडक दिली . असून कारचे मोठे नुकसान झाले असून कार पूर्णपणे डिव्हायडर व ट्रकच्या मध्ये कारचा चुराडा झाला.कारमध्ये चार जण हिंगोली कडून परभणी कडे जात होते .यामध्ये कारचालक वैभव ज्ञानोबा खिल्लारे वय ३२ वर्ष हे गंभीर जखमी झाले तर रूपाली वैभव खिल्लारे वय १९ वर्ष, शितल नारायण खिलारे वय २३ वर्षे, काव्या खिल्लारे सर्व राहणार सिंगणापूर तालुका जिल्हा परभणी हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी एस राहिरे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस,पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, जमादार संतोष पवार,रविकांत हरकळ, शाहेद सय्यद, अमोल चव्हाण, रमेश मस्के, हरिप्रसाद गुरुपवार, विश्वनाथ ढोणे, राजकुमार कुटे, संतोष धनवे,वसंत चव्हाण,संदीप इंगळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली .यानंतर ग्रामस्थ संदीप गोबाडे, शेख सिद्दीक, सह इतरांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

अपघात ठिकाणी  बघ्याची मोठी गर्दी झाली. तसेच औंढा - हिंगोली ,औंढा - परभणी रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. यादरम्यान कार्यक्रमानिमित्त जात असताना आमदार संतोष बांगर यांनी अपघातस्थळी पाहणी केली व जखमीचे विचारपूस करत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.औंढा नागनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

महंमदवाडीत भरधाव डंपरच्या धडकेत २० वर्षीय IT इंजिनिअर हमजा इब्राहिम सरकारचा मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी असून डंपर चालकाला अटक करण्यात आली.

Sep 23, 2026