परभणी ट्रक ब्रेक फेल

परभणीत उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक फेल ;सुदैवानी जिवीत हाणी नाही 

Parbhani Truck Brake Failure: परभणीमध्ये एका उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक फेल झाला, परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि काही जणांचे प्राण वाचले.

परभणीत उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक फेल ;सुदैवानी जिवीत हाणी नाही 

Parbhani Truck Brake Failure

५० मिनिटे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी क्रेनच्या मदतीने ट्रक हटवला

परभणी (Parbhani Truck Brake Failure) : शहरातील बसस्थानका समोरील जिंतूर रोड व गंगाखेड रोडला जोडणार्‍या उड्डाणपुलावर मंगळवार  ३१ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळून जीवितहानी टळली.

घटने बाबत अधिक माहिती अशी की, एमएच २३ एएन २९२० क्रमांकाचा मालवाहतूक करणारा (Parbhani Truck Brake Failure) ट्रक उड्डाणपुलावर चढत असताना (Parbhani Truck Brake Failure) अचानक ब्रेक फेल झाला. यामुळे ट्रक मागे सरकू लागल्याने पुलावरून जाणार्‍या वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु चालकाने धीर न सोडता प्रसंगावधान राखत ट्रक उड्डाणपुलाच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळवून थांबवला. त्यामुळे मागून येणार्‍या वाहनांवर होणारा संभाव्य अपघात टळला आणि मोठा अनर्थ टाळण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोनि दंतुलवार, पोउपनि बनाट, एएसआय सिद्दिकी यांच्यासह कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेमुळे सुमारे ५० मिनिटे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यानंतर क्रेनच्या साहाय्याने ब्रेक फेल झालेला ट्रक पुलावरून खाली उतरवण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या वेळी कोतवाली पोलिसांचे पथकही घटनास्थळी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026