Uttam Upahar Gruh

FDA चा मोठा दणका!प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह' सील; झुरळे, अस्वच्छता आणि निकृष्ट तेलामुळे परवाना निलंबित

राज्यभर अन्न सुरक्षा आणि भेसळविरोधी मोहिमेला वेग आलेला असताना अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध मे. उत्तम उपहार गृह या आस्थापनावर मोठी कारवाई केली आहे.

FDA चा मोठा दणका!प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह' सील; झुरळे, अस्वच्छता आणि निकृष्ट तेलामुळे परवाना निलंबित

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम सुरूच; गंभीर अनियमितता उघडकीस आल्यानंतर हॉटेल बंद, तेल व वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले

FDA ची धडक कारवाई; प्रसिद्ध उपहारगृहावर टाळे

छत्रपती संभाजीनगर : राज्यभर अन्न सुरक्षा आणि भेसळविरोधी मोहिमेला वेग आलेला असताना अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध मे. उत्तम उपहार गृह या आस्थापनावर मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान गंभीर अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्याने एफडीएने थेट या आस्थापनाचा परवाना निलंबित करत हॉटेल सील केले आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात कारवाईला वेग

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अवैध गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत आता छत्रपती संभाजीनगरातील इमरतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या उपहारगृहावरही धाड टाकण्यात आली.

तपासणीत धक्कादायक वास्तव उघड

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित अनेक गंभीर बाबी समोर आल्या. मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ तयार करताना वारंवार वापरलेले खाद्यतेल आणि वनस्पती तूप, अन्न तयार करण्याच्या जागेतील अस्वच्छता, झुरळांचा मुक्त वावर, ड्रेनेजजवळ उघड्यावर ठेवलेले इडलीचे पीठ, तंबाखूच्या पुड्या आणि भिंतींवर थुंकल्याच्या खुणा अशा अनेक त्रुटी निदर्शनास आल्या.

परवान्याबाबतही मोठा नियमभंग

तपासणीत असेही स्पष्ट झाले की, संबंधित आस्थापनाकडे रेस्टॉरंट प्रकारचा परवाना असताना प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात मिठाईचे उत्पादन केले जात होते. अशा प्रकारच्या उत्पादनासाठी स्वतंत्र उत्पादक परवाना आवश्यक असतानाही तो घेण्यात आला नव्हता.

निकृष्ट दर्जाचे तेल आणि वनस्पती तूप वापरल्याचा निष्कर्ष

समोसे आणि भजी तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार वापर केला जात असल्याचे तपासात उघड झाले. तेलाच्या गुणवत्तेची तपासणी करताना TPC चाचणीत BR रीडिंग 58 इतके नोंदवले गेले, जे सुरक्षित मर्यादेपेक्षा लक्षणीय जास्त असल्याचे एफडीएने नमूद केले.

याशिवाय इमरती आणि जलेबी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे वनस्पती तूप (डालडा) देखील पुन्हा-पुन्हा वापरले जात असल्याचे आढळले. या तुपाचे BR रीडिंग 36 नोंदवण्यात आले.

अन्न तयार करण्याच्या जागेत अस्वच्छतेचे साम्राज्य

एफडीएच्या पाहणीत अन्न तयार करण्याच्या परिसरात झुरळांचा वावर दिसून आला. कीटकनाशक फवारणी (Pest Control) केल्याची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. भिंतींवर जळमटे, काळपट तेलाचे थर आणि अस्वच्छ वातावरण आढळले. कचरापेटी झाकलेली नव्हती, तसेच खिडक्यांवर जाळ्या नसल्यामुळे स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याचे स्पष्ट झाले.

कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव

तपासणीदरम्यान येथे कार्यरत असलेल्या 25 ते 30 कामगारांकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट नसल्याचे समोर आले. तसेच मिठाई तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Tartrazine या कृत्रिम खाद्य रंगाचा वापर किती प्रमाणात आणि कोणत्या पद्धतीने करायचा, याची माहिती संबंधित कामगारांनाही नसल्याचे अधिकाऱ्यांनी नोंदवले.

ड्रेनेजजवळ इडलीचे पीठ, तंबाखूच्या पुड्याही आढळल्या

एफडीएच्या पथकाला इडलीसाठी आंबवलेले पीठ ड्रेनेज लाईनलगत उघड्यावर ठेवलेले दिसले. समोसे आणि भजी तयार करण्याच्या ठिकाणी तंबाखू आणि चुन्याच्या पुड्या आढळल्या, तर भिंतींवर थुंकल्याच्या खुणाही दिसून आल्या. या सर्व बाबी अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे एफडीएने नमूद केले.

परवाना निलंबित; नमुने प्रयोगशाळेत

या सर्व अनियमितता आणि अन्नसुरक्षेच्या गंभीर उल्लंघनांची नोंद घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित आस्थापनाचा परवाना तात्काळ निलंबित केला. हॉटेल सील करण्यात आले असून वापरलेल्या खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026