आमदार नवघरे जनता दरबार

आमदार नवघरे यांच्या जनता दरबारात नागरिकांना मिळतोय न्याय

MLA Navghare Janata Durbar: वसमत येथे आयोजित जनता दरबारात आमदार राजू पाटील नवघरे नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून त्यांनी अनेक समस्यांचा निपटारा केला.

आमदार नवघरे यांच्या जनता दरबारात नागरिकांना मिळतोय न्याय

MLA Navghare Janata Durbar

वसमत (MLA Navghare Janata Durbar ) : आमदार राजू पाटील नवघरे हे वसमत मध्ये जनता दरबार घेऊन नागरिकांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात नागरिकांना येथे तात्काळ न्याय मिळत असल्याने जनता दरबारात समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत आहे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात प्रचंड संख्येने नागरिक महिला यांनी आमदारांना भेटून समस्या  सांगितल्या आमदाराने तात्काळ संबंधित विभागाला संपर्क साधून प्रश्न सोडवल्याने समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले. वसमत येथे बुधवारी शासकीय विश्रामग्रह सभागृहात आमदार राजू पाटील नवघरे यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या जनता दरबारात ग्रामीण भागातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

महसूल विभाग कृषी विभाग नगरपालिका पंचायत समिती पोलीस विभाग, वन विभाग आरोग्य विभाग त्यांच्यासह विविध विभागाच्या अडचणी समस्या नागरिकांनी यावेळी मांडल्या आमदार राजू पाटील नवघरे यांनी सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आलेल्या अडचणी समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा व केलेल्या कारवाईची माहिती द्यावी अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या अनेक अधिकारी यांचा दरबारात प्रत्यक्ष उपस्थित होते त्यामुळे जागेवरच अडचणी व समस्यांचा निपटारा झाल्याचेही पहावयास मिळाले.

शक्तीपीठ महामार्ग संदर्भात अधिवेशनात पुन्हा मांडणार मुद्दा

शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात चोंडी बहिरोबा परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार राजू पाटील नवघरे यांची जनता दरबारात भेट घेतली यावेळी आमदार राजू पाटील नवघरे यांनी वसमत भावना तालुक्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील भावना आपण अधिवेशनात मांडल्या होत्या महामार्गाच्या कार्यकारी संचालकासोबत अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा करून वसमत तालुक्यातून महामार्ग जाण्यासाठी असलेला प्रचंड विरोध याची जाणीव करून दिली आहे येणाऱ्या अधिवेशनातही हा प्रश्न मांडणार आहे वसमत तालुक्यातील सुपीक जमिनी शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे याची जाणीव ठेवून आगामी अधिवेशनातही शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करणार असल्याचे आमदार राजू पाटील नवघरे (MLA Navghare Janata Durbar) यांनी शेतकऱ्यांना सांगितले

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

Vasmat Municipal Council Action: नगर परिषदेच्या मालकीच्या 175 चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यानी निर्णायक कारवाई केली आणि नगरपरिषद प्रशासनाने टिनशेड काढून..

Sep 30, 2026
औषधांच्या किंमतीत एवढी तफावत का? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले थेट प्रश्न

औषधांच्या किंमतीत एवढी तफावत का? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले थेट प्रश्न

कॅन्सरच्या औषधांच्या किंमतीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सवाल केले. २,७०० रुपयांचे औषध २७ हजारांना विकले जात असल्याच्या मुद्द्यावर सुनावणी झाली.

Sep 29, 2026