Vishal Rathod

केबीसीमध्ये २५ लाख जिंकून गोर बंजारा समाजाचे नाव रोशन करणाऱ्या विशाल राठोडचा पोहरादेवी धर्मपीठावर सन्मान!

केबीसीमध्ये २५ लाख जिंकणाऱ्या विशाल राठोड यांचा पोहरादेवी धर्मपीठावर धर्मगुरु जितेंद्र महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

केबीसीमध्ये २५ लाख जिंकून गोर बंजारा समाजाचे नाव रोशन करणाऱ्या विशाल राठोडचा पोहरादेवी धर्मपीठावर सन्मान!

मानोरा :  गोर बंजारा धर्मपीठ पोहरादेवी येथे धर्मगुरु जितेंद्र महाराज यांच्या हस्ते ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) या राष्ट्रीय मंचावर २५ लाख रुपये जिंकून गोर बंजारा समाजाचे नाव रोशन केल्याबद्दल मंगरूळपीर तालुका कळंबा बोडके येथील विशाल प्रेमचंद राठोड यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

सामान्य कुटुंबातील असूनही जिद्द, मेहनत आणि ज्ञानाच्या बळावर विशाल राठोड यांनी अमिताभ बच्चन यांच्या केबीसी मंचावर २५ लाख रुपयांपर्यंत मजल मारली. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण बंजारा समाजात आनंदाचे वातावरण असून, समाजातील युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.

यावेळी धर्मपीठावर धर्मगुरु जितेंद्र महाराज यांनी विशाल यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल राठोड यांच्या या ऐतिहासिक यशामुळे पोहरादेवी नगरीसह वाशिम जिल्ह्यात अभिमानाची लाट उसळली आहे.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

Manora Drought declared: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने काढलेला दुष्काळी शासन निर्णय 'कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर' आहे. दुष्काळी उपाययोजना

Sep 28, 2026
तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

Manora Tehsil Office: मानोरा शहरातील गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा भटक्या श्वानांचा मुक्त वावर वाढला असून, कामकाजाच्या वेळेतच या कुत्र्यांनी सरकारी कार्यालयात..

Sep 27, 2026
बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

Sep 26, 2026
मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुक्यात अनेक गावांत रात्री संशयास्पद ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती. प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी.

Sep 26, 2026