हातपंप ते पाईपलाईन… बुलढाण्यात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी मोठे निर्णय

तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी मौजे धाड येथे आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

हातपंप ते पाईपलाईन… बुलढाण्यात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी मोठे निर्णय

Water Crisis Prevention

बुलढाणा तालुक्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी आढावा बैठक; तातडीच्या उपाययोजनांना गती देण्याच्या सूचना

बुलढाणा (Water Crisis Prevention) : तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी मौजे धाड येथे आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. चिखली विधानसभा मतदारसंघातील या बैठकीत संबंधित विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

नागरिकांना सुलभ व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी हातपंप दुरुस्ती, विहीर अधिग्रहण, विहीर दुरुस्ती तसेच पाईपलाईनची कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

सदर योजनेअंतर्गत ३४ गावांपैकी १६ गावांच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित योजनांसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला असून तो लवकरच संबंधित विभागांना वितरित होणार आहे. त्यामुळे प्रलंबित योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील कामेही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस गटविकास अधिकारी अमिता पवार, देविदास पाटील जाधव (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), संजय गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), नायब तहसीलदार अनंता पाटील, श्रीरंग अण्णा वेंडोले, ॲड. सुनील देशमुख, अनिल जाधव (तालुका अध्यक्ष, भाजप), योगेश राजपूत (जिल्हाध्यक्ष, व्हीजेएनटी सेल), नीलेश गुजर (उपजिल्हा प्रमुख, शिवसेना), प्रदीप टाकसाळ (तालुका अध्यक्ष, युवा मोर्चा), अमोल शिंदे, विशाल वीसपुते (जिल्हा उपाध्यक्ष, युवा मोर्चा), नीतेश खुसाळकर (उपअभियंता, पाणीपुरवठा), किरण पाटील (उपकार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण), तसेच महावितरणचे प्रतिनिधी, निलेश देठे (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असून विविध उपाययोजना तातडीने राबवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026