Waterfall Accident

रिल्सचा मोह जीवावर बेतला! खोपोलीतील केपी वॉटरफॉलवरून ४०-५० फूट दरीत पडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

​​​​​​​पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी खोपोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

रिल्सचा मोह जीवावर बेतला! खोपोलीतील केपी वॉटरफॉलवरून ४०-५० फूट दरीत पडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Waterfall Accident

ठाण्यातील अभिषेक कुशवाह याचा सेल्फी काढताना पाय घसरला; रात्रभर शोधमोहीम राबवल्यानंतर पहाटे मृतदेह बाहेर

पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी खोपोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल परिसरात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात ठाणे येथील २३ वर्षीय अभिषेक कुशवाह याचा सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. रात्रभर सुरू असलेल्या बचाव आणि शोधमोहीमेनंतर सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सेल्फी काढताना घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ठाण्यातील चार मित्र पर्यटनासाठी खोपोलीजवळील केपी वॉटरफॉल येथे गेले होते. धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर ते परतीच्या मार्गाने निघाले. त्यावेळी निसर्गरम्य दृश्य टिपण्यासाठी अभिषेक कुशवाह याने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे परिसरातील जमीन अत्यंत निसरडी झाल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळला.

रात्रभर सुरू होती शोधमोहीम

घटना घडताच अभिषेकच्या मित्रांनी स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पाऊस, अंधार आणि दरीचा अवघड भूभाग यामुळे शोधकार्याला अडथळे येत होते. तरीही स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने रात्रभर प्रयत्न सुरू ठेवले. अखेर सोमवारी पहाटे सुमारे ४ वाजता अभिषेकचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले.

प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन

या घटनेनंतर ठाणे आणि खोपोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात पर्यटनस्थळी भेट देताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. विशेषतः धोकादायक आणि निसरड्या ठिकाणी रिल्स किंवा सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. केवळ फोटो किंवा व्हिडिओसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये तसेच पर्यटनादरम्यान प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026