धनगरवाडी शिकार प्रकरण

धनगरवाडी शिवारातील वन्यजीव शिकार प्रकरण; दोघांना १९ ऑगस्टपर्यंत वनकोठडी

Dhangarwadi poaching case: सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारात हरणाची शिकार करून त्याचे मांस बाळगल्याप्रकरणी वन विभागाने अटक केलेल्या दोन संशयितांना सेनगाव न्यायालयाने १९ ऑगस्ट २०२६ पर्यंत वनकोठडी

धनगरवाडी शिवारातील वन्यजीव शिकार प्रकरण; दोघांना १९ ऑगस्टपर्यंत वनकोठडी

Dhangarwadi poaching case

सेनगाव (Dhangarwadi poaching case) : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारात हरणाची शिकार करून त्याचे मांस बाळगल्याप्रकरणी वन विभागाने अटक केलेल्या दोन संशयितांना सेनगाव न्यायालयाने १९ ऑगस्ट २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावली. शिकारीच्या प्रकरणातील फरार सहआरोपींचा शोध घेण्यासह जप्त केलेले मांस कोणत्या वन्यप्राण्याचे आहे, याची वैज्ञानिक तपासणी आणि या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी वनकोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद वन विभागाच्या वतीने करण्यात आला.

हे नक्की बघा: धनगरवाडी शिवारात हरणांची शिकार; दोघे वन विभागाच्या ताब्यात

प्रभाकर दत्ताराव काडबांडे आणि गजानन भिकाजी इंगळे या दोघांना सोमवारी (दि. १७) वनक्षेत्रपाल एम. एस. केंद्रे यांनी न्यायदंडाधिकारी एस. एस. जैस्वाल यांच्या न्यायालयात हजर केले. (Dhangarwadi poaching case) सुनावणीदरम्यान सरकारी वकील डी. एस. भारती यांनी गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याचे सांगत फरार सहआरोपींना जेरबंद करणे, जप्त मांसाची वैज्ञानिक तपासणी करणे तसेच या प्रकरणाशी संबंधित अन्य बाबींचा तपास करण्यासाठी वनकोठडीची मागणी केली.

दरम्यान, आरोपींचे वकील पी. जी. नायक यांनी आरोप फेटाळून लावत आरोपी शिकारी करताना आढळून आलेले नसून त्यांना या प्रकरणात खोट्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा दावा केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी एस. एस. जैस्वाल यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन फरार सहआरोपींचा शोध घेण्यासाठी वनकोठडी आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यानुसार दोन्ही संशयितांना १९ ऑगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. आदेशाची प्रत हिंगोली येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यां कडे पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास वनक्षेत्रपाल एम. एस. केंद्रे करीत आहेत.

१६ किलो मांस, कातडी जप्त

धनगरवाडी शिवारात हरणाची शिकार करून मांस साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक रविवारी धनगरवाडी शिवारात दाखल झाले. पाहणीदरम्यान एका झाडाखाली अंदाजे १६ किलो मांस आणि कातडी आढळून आली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, घटनास्थळावरून काही जण पसार झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

या (Dhangarwadi poaching case) कारवाईत डॉ. राजेंद्र नाळे, सचिन माने, माधव केंद्रे, गणेश मिसाळ यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

संबंधित सामग्री

मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या; वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या; वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

मोकळ्या जंगलात मुक्तपणे वावरणारा बिबट्या अचानक संरक्षक जाळीत अडकला. बाहेर पडण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड पाहून परिसरात चिंता निर्माण झाली.

Aug 29, 2026
धनगरवाडी शिवारात हरणांची शिकार; दोघे वन विभागाच्या ताब्यात

धनगरवाडी शिवारात हरणांची शिकार; दोघे वन विभागाच्या ताब्यात

Dhangarwadi Deer Hunting: सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारात हरणांची शिकार झाल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. १६ दुपारी धडक कारवाई केली.

Aug 16, 2026
विहीरीत पडलेल्या कोल्हयाला वनविभागाकडून जीवनदान

विहीरीत पडलेल्या कोल्हयाला वनविभागाकडून जीवनदान

Chikhli Forest Department: तालुक्यातील मौजे चिखली येथील रमेश चव्हाण यांच्या शेतमधील विहिरीत दि. १० ऑगस्ट रोजी कोल्हा  पडलेल्या अवस्थेत शेतकऱ्याला आढळला.  त्याने ही बाब लगेच वन कर्मचाऱ्यांना माहिती

Aug 10, 2026
कासवाची शिकार करणे पडले महागात; ३ आरोपी वनविभागाच्या ताब्यात 

कासवाची शिकार करणे पडले महागात; ३ आरोपी वनविभागाच्या ताब्यात 

Nagpur Turtle Hunting: वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून कासवाची बेकायदेशीर शिकार करून लोखंडी सत्तूर च्या साहाय्याने चिरफाड करून कवटी वेगळी केली व निघालेले संपूर्ण मांस फस्त

Aug 05, 2026
वाकलमध्ये एका महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

वाकलमध्ये एका महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

Vakal leopard captured: वाकल व परिसरात राहणारे बिबट्या महिन्यापासून नागरिकांना धमक्यावर ठेवत असल्यासारखे काम करीत असे. वन विभागाने हा बिबट्या जेरबंद करण्याच्या यश आले.

Aug 03, 2026