औशा महिला मोर्चा

तात्काळ दुष्काळ जाहीर करा; औशात महिलांचा आक्रोश मोर्चा!

Ausa Women protest: लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून गेली असून, कष्टाने पेरलेले सोयाबीन

तात्काळ दुष्काळ जाहीर करा; औशात महिलांचा आक्रोश मोर्चा!

Ausa Women protest

 

शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाखांची मदत देण्याची मागणी

औसा (Ausa Women protest) : लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून गेली असून, कष्टाने पेरलेले सोयाबीन हातात येण्याआधीच उद्ध्वस्त झाले आहे. या (Ausa Women protest) पार्श्वभूमीवर लातूरसह मराठवाडा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी औशात महिलांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

जिल्हा परिषद सदस्य दीपाली शाम भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि. १५ सप्टेंबर रोजी (Ausa Women protest) औसा मोड ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हातात करपलेले सोयाबीन घेऊन मोठ्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झाल्या. ‘तात्काळ दुष्काळ जाहीर करा’, ‘शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये मदत द्या’, ‘नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये द्या’, ‘पिकांचे तातडीने पंचनामे करा’ अशा घोषणांनी औसा शहराचा परिसर दणाणून गेला.  

यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, प्रहार  संघटनेचे दत्ता आनंदगावकर, पप्पू भोसले, बबन भोसले, गणेश पाटील, काका पवार हरेगाव, कृष्णा जावळे,सयाजी दारफळकर, नेताजी भोसले, दयानंद भोसले, सरपंच सुजाता बनसोडे, पद्मिनी कोकासाहेब पवार, पार्वती सूर्यवंशी, अनुसया चव्हाण, सोनाली चव्हाण, जनाबाई चव्हाण, शमाबी शेख, जन्नतबी शेख, शामामबी चव्हाण, मंजुश्री चव्हाण, ऐशाळी शेख, सुनीता संजय चव्हाण, संगिता बनसोडे, सविता कांबळे, योगिता कांबळे, कस्तुराबाई मंगरुळे, गवळण मंगरुळे, रूपाली कांबळे, अंजना मंगरुळे, सुरेखा मंगरुळे, अनुसया वाघमारे, सुकमारबाई कांबळे, सुरेखा जाधव, भानीबाई कांबळे, अन्नपूर्णा कांबळे, रेखा कोव्हाळे, सचिता भेडाले, गिरिजा कोव्हाळे, बोपदी कोहाळे, लक्ष्मी कोव्हाळे, निमा कोव्हाळे आदीसह मोठया संख्याने शेतकरी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

दारूबंदी व ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित लाभासाठी निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा

दारूबंदी व ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित लाभासाठी निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा

Akola Women Morcha: गावागावात वाढत असलेल्या अवैध गावठी दारूच्या विक्रीला आळा घालावा तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रलंबित लाभ पात्र महिलांना तातडीने मिळावा

Aug 18, 2026
CJP आंदोलनात लाठीचार्ज! महिला आंदोलकांशी गैरवर्तनाचे आरोप; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

CJP आंदोलनात लाठीचार्ज! महिला आंदोलकांशी गैरवर्तनाचे आरोप; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आयोजित 'संसद चलो' मोर्चादरम्यान घडलेल्या घटनांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Jul 22, 2026
ब्राह्मण गल्लीतील महिलांचा स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी आक्रमक पवित्रा, आंदोलनाचा इशारा

ब्राह्मण गल्लीतील महिलांचा स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी आक्रमक पवित्रा, आंदोलनाचा इशारा

Kalamnuri Women Protest: शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या समस्यांमुळे संतप्त महिलांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

Jun 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात लाडक्या बहिणींचा संताप, योजनेच्या पैशांसाठी ठिय्या 

जिल्हाधिकारी कार्यालयात लाडक्या बहिणींचा संताप, योजनेच्या पैशांसाठी ठिय्या 

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नसल्यामुळे संतापित महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाडक धरले. त्यांना पैशांची गरज असल्याने प्रशासनाला धारेवर धरले गेल्या.

May 20, 2026
पानकनेरगावात वाईन बारविरोधात महिलांचा एल्गार

पानकनेरगावात वाईन बारविरोधात महिलांचा एल्गार

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे वाईन बारच्या कथित मनमानी कारभाराविरोधात महिला वर्ग व ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावात दारूबंदी लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.

May 20, 2026