माजी मंत्री माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार!
रिसोड (Appointed Sarpanch) : रिसोड तालुक्यातील वनोजा येथील नवनिर्वाचित सरपंच पदी आरुढ झालेल्या सौ कमलताई ज्ञानबा पौळकर तसेच सेवा सहकारी सोसायटी वनोजा यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रतापराव देशमुख (Prataprao Deshmukh) यांचा माजी मंत्री माजी खासदार अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वनोजा सेवा सहकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी प्रतापराव देशमुख यांची निवड!
रिसोड तालुक्यातील ग्राम वनोजाच्या सरपंचदी ग्रामपंचायत सदस्याने गावकरी यांच्यात ठरल्याप्रमाणे सौ.कमलताई ज्ञानबाराव पौळकर यांची निवड झाली. तसेच वनोजा सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रतापराव देशमुख यांची निवड झाली. त्याबद्दल रिसोड येथे माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच आणि सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष यांचा सत्कार पार पडला. माजी मंत्री देशमुख यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन दोघांचाही सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक आणि विकासात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या पार पडलेल्या सत्कार समारंभास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खरात ज्ञानबा पौळकर, गजाननराव देशमुख, संदीप धांडे सहित मान्यवर उपस्थित होते.