हिंगोली (Hingoli Education) : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘निपुण भारत’ अभियानाच्या धरतीवर राज्यशासनाने ‘निपुण अभियान महाराष्ट्र’ २०२१ पासुन राबविले होते. या (Hingoli Education) अभियानाचा दुसरा टप्पा जिल्ह्यात सुरू करीत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मूलभूत वाचन व संख्याज्ञान प्राप्त करणे, यासाठी विद्यार्थ्यांच्या संपादणुकीच्या स्थितीचा नियमित आढावा घेणे, शिक्षकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करणे, शाळा भेटीच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. याव्दारे मूलभूत वाचन व संख्याज्ञान प्राप्त करणे, संपादणुक तपासणीसाठी अध्ययनस्तर निश्चीत करणे, नियमित आढावा घेणे, सक्षम मुलांची (Hingoli Education) स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करून घेणे, मासिक बैठकीतून संपादीत गुणवत्तेचे सादरीकरण करणे, शैक्षणिक दिनदर्शिका लागू करणे अशी उदिष्ट्ये या मोहीमेची राहणार आहेत.
या (Hingoli Education) अभियानाच्या माध्यमातून ‘आईच्या नावाने एक झाड’, गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विद्यांजली या शासकीय उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या करीता राज्यशासनाच्या निपुण महाराष्ट्र या अॅप च्या माध्यमातून पालकांना सहभागी केले जाणार आहे. या संबंध अभियानात शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या सेवाभावी संस्थानाही सहभागी केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.