बुलढाणा (Archer Mihir Apar) : आर्चरी अर्थात तिरंदाजी मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी चमकदार कामगिरी केलेल्या (Archer Mihir Apar) तिरंदाज मिहीर अपार याची निवड कॅनडातील युथ वर्ल्ड स्पोर्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात करण्यात आली आहे.
हि निवड 21 ते 25 मे दरम्यान आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुणे येथे भारतीय संघाची निवड चाचणी दरम्यान पार पडली. सदर निवड चाचणीमध्ये बुलडाण्याचा तिरंदाज मिहीर नितीन अपार याची भारतीय संघात निवड झाली. (Archer Mihir Apar) मिहीर अपार याने यापूर्वी सुध्दा पोलंड येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
सदर निवड चाचणीमधे निवड झालेला भारतीय संघ युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप कॅनडा तसेच एशिया कप स्टेज सिंगापूर साठी भारताचे प्रतिनिधित्व करेल. (Archer Mihir Apar) मिहीर हा गेल्या १० वर्षापासून प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्याकडे सराव करतो. मिहीर हा आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक चंद्रकांत इलग व आईवडीलांना देतो.