तब्बल 14 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया/अर्जुनी मोर (Arjuni Police) : विद्युत तार चोरी प्रकरणात अर्जुनी/मोरगाव (Arjuni Police) पोलीसांनी सहा आरोपींच्या टोळीस ताब्यात घेवुन गुन्ह्यात वापरलेल्या 3 वाहनांसह एकुण 14 लाख 95 हजार रुपयाांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार दि.28 आक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023 दरम्यान अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील डोंगरगाव ते घुसोबाटोला येथील 19 विद्युत खांबावरील विद्युत तार 3420 मीटर लांब किंमत 60 हजार रुपए तसेच डोंगरगाव ते अर्जुनी ते नवेगाव/बांध पर्यंत चे 16 खांबावरील विद्युत तार 33 के.व्ही 2880 मीटर लांबीचे किंमत 50 हजार रुपये असा एकुण एक लाख दहा हजार रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरुन नेले, अशा तक्रारी वरुन पोलीस स्टेशन अर्जुनी/मोरगाव येथे अपराध क्रमांक 313/2023 कलम 379 भा.दं.वि अन्वये (Arjuni Crime) गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांनाच दि.21 मे ते 24 मे 2024 दरम्यान मौजा सोमलपुर ते गुढरी येथील 23 खांबांवरील विद्युत तार 11 के.व्ही 2700 मीटर लांबी किंमत 60 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी झाल्याच्या तक्रारी वरुन अपराध क्रमांक 169/2024 कलम 379 भा.दं.वि अन्वये गुन्हा दाखल करुन पोलीसांनी तपास सुरु केला. सदर तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या निर्देशानुसार (Arjuni Police) पोलीसांनी शोधमोहीम सुरु करुन त्यांच्या सुत्रांच्या व तंत्रज्ञानाचा वापर करुन पुरावे जमा केले. सदर पुराव्याच्या आधारे आरोपी क्रमांक 1) सचिन कठनकर रा.साकोली,2) तुषार लांजेवार रा.निलज,3) परवेज अगवान रा.आमगाव/बु,4) दिपरत्न उनके रा.पळसगाव/सोनका,5) निखिल मडावी रा.सानगडी आणि 6) आनंदराव निर्वान रा.सौंदड यांना ताब्यात घेवुन त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केले असल्याचे कबुल केले.
सदर आरोपींनी चोरलेला सर्व मुद्देमाल हा भंडारा येथील कबाडी दुकानदाराकडे विक्री केला होता. सदर माल हा वितळवलेल्या ॲल्युमिनियमच्या प्लेट्स व चुरा असलेला 285 किलो किंमत 17 हजार रुपयाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले तीन वाहन महिंद्रा कंपनीची झायलो गाडी क्रमांक एम.एच 48 ए 2743 किंमत 2 लाख पंच्याहत्तर हजार रुपये,टाटा कंपनीची इंट्रा गाडी क्रमांक एम.एच 34 एव्ही 1320 किंमत 46 हजार रुपये आणि महिंदा कंपनीचा पिकअप गाडी क्रमांक एम.एच 35 एजे 2303 किंमत 59 हजार रुपये असा एकुण 14 लाख 95 हजार रुपये चा मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत करण्यात आला.
पाच आरोपी (Arjuni Police) पोलीस कोठडीत असुन सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोउनि.किरण मेश्राम,पो.हवा.रोशन गोंडाने,रमेश सेलोकर,बापु येरणे,महेंद्र पुन्यप्रेड्डीवार,पो.शि.गिरीश लांजेवार, लोकेश कोसरे,तिलक पर्वते,श्रीहरी कोरे व आंदींनी केला असुन कार्रवाई केली आहे.