कार, ट्रॅक्टर, ऑटोसह तीन मोटारसायकलचा समावेश
वाशीम (Vehicles fire) : शहरातील संजय व्हिडिओ जवळ असलेल्या शिव चौक परिसरातील दिलीप आप्पा काष्टे यांच्या अंजली मोटार गॅरेज ला अज्ञात इसमाने आग लावली. यामध्ये कार, एक ट्रॅक्टर, ऑटोसह तिन (Vehicles fire) मोटार सायकली जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये गॅरेजचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सदर घटना २९ जून रोजी रात्री दोन वाजताचे सुमारास घडली.
शहरातील गुरुवार बाजार परिसरात असलेल्या शिव चौकामध्ये दिलीप काष्टे यांचे अंजली गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची दुरुस्ती करुन डेंटींग पेन्टींगची कामे केल्या जातात. दरम्यान दि. २९ जुनच्या मध्यरात्री पाऊस सुरू असल्याने विद्युत पुरवठा बंद होत. नेमका या संधीचा फायदा घेत अज्ञात इसमाने अंजली गॅरेजला आग लावली आणि तो तिथून पसार झाला.
या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर दिलीप काष्टे यांचे कुटुंबाला जाग आली. यावेळी दिलीप आप्पा काष्टे यांनी बाहेर येऊन बघितले असता आगीने रौद्र रूप धारण केले होते. काष्टे यांनी (Vehicles fire) आग विझवण्यासाठी शेजारच्या लोकांची मदत घेतली. परंतु आग विझवेपर्यंत गॅरेजमध्ये असलेले मोटर सायकल, कार , ट्रॅक्टर आणि ऑटो या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सदर नुकसान अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची वाशीम शहर पोलीस स्टे. ला तक्रार दिली असुन पुढील तपास ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करत आहेत.




