वर्गणी करून उभारले आहे महाराजांचे मंदिर
मानोरा (Dr. RamRao Maharaj) : तालुक्यातील वापटा तांड्यातील नागरिकांनी सामूहिक निधी जमा करून बालब्रह्मचारी व महान तपस्वी दिवंगत संत डॉ. रामराव बापू महाराज (Dr. RamRao Maharaj) यांच्या देवालयाची निर्मिती केली असून नवनिर्मित मंदिरामध्ये संत डॉ. रामराव महाराज यांच्या मूर्तीची स्थापना पोहरादेवी येथील महाराज परिवारातील चैतन्य कबीरदास महाराज यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात मूर्तीची स्थापना देवालयात करण्यात आली.
वापटा येथे जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज यांचे भव्य मंदिर असून या मंदिर परिसरातच संत डॉ. रामराव बापू महाराजांचे (Dr. RamRao Maharaj )नवीन मंदिराची निर्मिती ग्रामस्थां द्वारे करण्यात आली आहे. संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या मूर्तीची स्थापना नवीन उभारण्यात आलेल्या मंदिरात करण्यापूर्वी दोन दिवसांपासून ब्राह्मणांच्या उपस्थितीत होम हवन केले जात होते. होम हवन विधी मध्ये स्थानिक सुखदेव चव्हाण, रंजना सुखदेव चव्हाण, चरण चव्हाण, वंदना चरण चव्हाण, रंजीत चव्हाण, अंजली रंजीत चव्हाण, काळू राठोड, डोमीबाई काळू राठोड, आनंदा चव्हाण, बेबीबाई आनंदा चव्हाण या दांपत्यानी होम विधीमध्ये सहभाग नोंदविला.
मान्यवरांच्या हस्ते मूर्ती स्थापना करण्याआधी माता जगदंबा संत सेवालाल महाराज यांची आरदास ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात देवी जगदंबा,संत सेवालाल महाराज व तपस्वी संत डॉ. रामराव महाराज (Dr. RamRao Maharaj) यांना भोग देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक गावकरी व पुजारी साहेबराव चव्हाण आणि महादेव राठोड यांनी परिश्रम घेतले.