नवी दिल्ली (Asian Champions Trophy) : हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान चीनचा सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात पाकिस्तानचा यजमान संघाविरुद्ध पराभूत झाला. पाकिस्तानच्या पराभवाचा विचारही कोणी केला नव्हता पण हेच घडले. (Asian Champions Trophy) चीनने पाकिस्तानला पराभूत करून प्रथमच अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. पाकिस्तानी संघाला मोठा झटका बसला आहे. चीनने शानदार खेळ करत पहिला गोल करत आघाडी घेतली. पाकिस्तानकडूनही एक गोल झाला.
यानंतर दोन्ही संघांनी सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला आणि प्रकरण पेनल्टी शूटआऊटमध्ये गेले. पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळालेल्या संधींचा फायदा उठवण्यात पाकिस्तानी संघ अपयशी ठरला आणि त्याचे परिणाम त्यांना पराभवाच्या रूपाने भोगावे लागले. चीनने हा सामना 2-0 असा जिंकला. (Asian Champions Trophy) पाकिस्तान संघ आणि चाहत्यांचे स्वप्न भंगले आहे. चीनने प्रथमच अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे. जिंकल्यानंतर चीनच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला कारण त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि कोरिया यांच्यात सामना होणार आहे. हा (Asian Champions Trophy) सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. चीनची टीम तिथे आधीच हजर आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी करत मजबूत गती गाठली आहे.