पुसद (Youth weapon Attack) : एकीकडे पुसदकर स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाचा आनंद घेत असतांना दुसरीकडे येथील संतोषी माता मंदिर समोर रक्त रंजित खेळ सुरु होता.१५ऑगस्ट रोजी सकाळी रोजी सकाळी ११वा. च्या सुमारास संतोषी माता मंदिर समोर मो. कलीम उर्फ बबलु मो. युनुस कुरेशी रा. वसंत नगर, या (Youth weapon Attack) युवकावर अजय पंडीत जोगदंडे (२४) , प्रसाद राजाभाऊ जोगदंडे (२३) , तुषार उर्फ नट्टया प्रदिप लोखंडे (१८) सर्व रा. आंबेडकर वार्ड, पुसद यानी जखमीवर जिवघेणा हल्ला करुन चाकून ५ वार करुन गंभीर जखमी केले.
जखमीला उपजिल्हा रुग्णालय, पुसद व त्यानंतर यवतमाळ येथे रेफर करण्यात आलेले आहे असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी सांगितले. दरम्यान आरोपींपैकी अजय जोगदंडे व, तुषार उर्फ नट्टया प्रदिप लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे. जुन्या वैमनस्यातुन हा प्राण घातक हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. मात्र वर्दळी च्या ठिकाणी झालेल्या (Youth weapon Attack) प्राण घातक हल्ल्याच्या घटनेने येथे एकच खळबळ उडाली. मागील आठवड्यात वसंतनगर पो स्टे अंतर्गत गोळीबार झाल्याचीही घटना घडली होती.