हिंगोली (Assembly election training) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ११ ते १५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असल्यामुळे जिल्ह्यातील पाचही तहसीलदारांचा पद्भार नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी नगरात पाच दिवस प्रशिक्षण
विधानसभा निवडणूक (Assembly election) येत्या काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्या निमित्ताने हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ, कळमनुरीचे तहसीलदार जिवककुमार कांबळे, सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे, वसमत तहसीलदार शारदा दळवी, औंढा तहसीलदार हरीष गाडे यांना १० सप्टेंबरला कार्यमुक्त करण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काढले आदेश
कार्यालयीन कामकाज, नैसर्गीक आपत्ती, गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तहसीलदार पदाचा अतिरीक्त पदभार हिंगोली नायब तहसीलदार एस. के. कोकरे, कळमनुरी नायब तहसीलदार व्ही. एल. मुदीराज, सेनगाव नायब तहसीलदार बी. के. गायकवाड, वसमत नायब तहसीलदार दामोधर जाधव, औंढा ना. तहसीलदार अनिता कोलगणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या (Assembly election) संदर्भात जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी आदेश काढले होते.
