अवकाळीच्या दुसऱ्या यादीची आर्थिक मदत अडली
पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे डोहाळे
देशोन्नती वृत्तसंकलन
हरदोली/सिहोरा (Farmers KYC) : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या धान पिकांचे शेतकऱ्यांना अर्थिक मदत देण्यासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात पहिली यादी जाहीर करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी केवायसी (Farmers KYC) केली असता आर्थिक मदत देण्यात आली. परंतू अनेक नावे वगळण्यात असल्याने दुसरी यादी प्रसिध्द करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांनी केवायसी केली. परंतू त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. यानंतर पूरग्रस्त शेतकऱ्याच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे डोहाळे लागले आहेत. शासनाने तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अवकाळी पावसाने उन्हाळी धान पिकांचे नुकसान झाले. तलाठ्यांनी नुकसानग्रस्त (Farmers KYC) शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे केले. या याद्या महसूल विभागाला देण्यात आलेल्या आहेत. याच कालावधीत वादळ आणि पावसाने धान पिकांना चांगलेच झोडपले. एक नव्हे दोनदा शेतकऱ्याचे धान पिकांचे नुकसान झाले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याने व निवडणूक असल्याने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याने शेतकरी अपेक्षित नव्हते. परंतू निवडणुकीच्या काळात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. पहिल्या यादीत नावे असल्याने शेतकऱ्यांनी केवायसी केली असल्याने अवघ्या दोन दिवसात ही आर्थिक मदत देण्यात आली. परंतू पहिल्या यादीत बहुतांश शेतकऱ्याची नावे वगळण्यात आली होती.
यामुळे शेतकऱ्याची ओरड सुरू झाली. तलाठ्यांना जाब विचारणे सुरू झाले. यादरम्यान तलाठ्यांचे टेन्शन वाढले. दुसरी यादी प्रसिध्द होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. विधानसभेची निवडणूक आटोपताच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिध्द करण्यात आली. या यादीत नाव असल्याने शेतकऱ्यांचे समाधान झाले. दुसऱ्या यादीत नावे असल्याने शेतकऱ्यांनी केवायसी केली. परंतू पहिल्या यादी प्रमाणे दोन दिवसांत शेतकऱ्यांचे बचत खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली नाही.
अवकाळीच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीवर अर्थिक मदत गुरफटला गेली असताना तिनदा पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मात्र आर्थिक मदत जलदगतीने देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला नाही. नद्यांचे काठावरील गावात पुराचे पाणी शिरले होते. एक नव्हे तिनदा पुराचे पाणी धानाचे पिकांमध्ये शिरले होते. प्रचंड धान पिकांची नासाडी झाली आहे. शासनस्तरावर तलाठ्यांनी नुकसानग्रस्त (Farmers KYC) शेतकऱ्यांचे याद्या दिलेल्या आहेत. परंतू या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे याद्याच नसल्याने शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली नाही. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत लांबणीवर गेली आहे. शासनस्तरावरून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
यादीतील नावावरून गोंधळ
सोशल मीडियावर ई-केवायसी (Farmers KYC) करण्यासाठी याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. अवकाळी असे नावे दिले जात आहेत. पुन्हा-पुन्हा याच याद्या दिल्या जात आहेत. शेतकरी नावे दिसल्यानंतर ई-केवायसी करण्यासाठी पुढाकार घेत आहे. नंतर पुन्हा हीच यादी प्रसिध्द केली जात आहे. यामुळे गोंधळ उडत आहे. आताच केवायसी केल्याचे सांगून शेतकरी काणाडोळा करीत आहेत. यादी प्रसिध्द करतांना नुकसानग्रस्त वर्ष आणि हंगामाचे नाव देणे आवश्यक आहे. यामुळे गोंधळाची स्थिती होत असल्याने सत्यापन यादी असताना शेतकरी केवायसी करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. यामुळे यादी प्रसिध्द करतांना या बाबी लक्षात घेण्याची मागणी होत आहे.