Wardha :- अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन (police station) अंतर्गत येत असलेल्या कठोरा (बु) येथील पोटे पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्यामसुंदर भुतडा (५४) (रा. पोटे टाऊनशिप, अमरावती) यांनी त्याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ४६ वर्षीय परिचारिकेवर अडीच वर्षांपासून सातत्याने शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल केली. अनैसर्गिक अत्याचारासह नराधम प्राचार्याने परिचारिकेच्या(nurses) मुलीलाही शारीरिक सुखाची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पीडित परिचारिका २०२२ मध्ये महाविद्यालयात रुजू झाली होती. १६ डिसेंबर २०२२ रोजी प्राचार्याने तिला कार्यालयात बोलावले, जिथे जबरदस्तीने अत्याचार केला. विरोध केल्यास नोकरीवरून हकालपट्टीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. एप्रिल २०२५ पर्यंत अत्याचाराची मालिका सुरू राहिली. मानसिक त्रासामुळे पीडितेची तब्येत बिघडली; उपचारासाठी ती महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेली असता प्राचार्याने उपचार थांबवण्याचे आदेश देऊन तीला आवश्यक उपचार मिळण्यापासून रोखले. नराधम प्राचार्याचा विकृतपणाचा कळस म्हणजे परिचारिकेच्या तरुण मुलीवरही लक्ष ठेवत शारीरिक सुखाची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्यामुळे एप्रिल २०२५ मध्ये त्या नराधम प्राचार्याने पीडितेला नोकरीवरून काढले.
आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पीडितेने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलीस स्टेशनने प्राचार्याविरुद्ध बलात्कार, लैंगिक शोषण(sexual exploitation) व धमकीसह गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने शैक्षणिक वर्तुळासह संपूर्ण समाजात प्रचंड खळबळ निर्माण केली आहे.