हिंगोली (Minister Uday Samant) : राज्याचे उद्योग व भाषा मंत्री कथा रत्नागिरी चे पालकमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचे उद्घाटन वि. वा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात आले. यावेळी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. डॉ.सुनीता ताई मोडक यांनी 2 हजार 517 महाराष्ट्र सेवाभावी संस्था संघटित केल्याने त्यांचे कौतुक शासनाकडून व उद्योग विभागाकडून उद्योगासाठी मदत करू असे आश्वासन (Minister Uday Samant) उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले..
या प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांचा सत्कार डॉ. सुनिताताई मोडक राज्य अध्यक्षा यांनी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व संस्थेचे मानचिन्ह देऊन केला. यावेळी उद्घाटनपर भाषणात उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सौ. डॉ. सुनिताताई मोडक यांनी 2 हजार 517 सेवाभावी संस्था संघटीत केल्याबदल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या संदर्भात त्यांना जी मदत लागेल ती मदत निश्चित केली जाईल,त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मुभा असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.
महत्वाचे म्हणजे या सर्वसंघटीत सेवाभावी संस्थांनी स्वार्थ बाजुला ठेवून प्रामाणिकपणे समाज प्रबोधनाचे कार्य करावे, असेही (Minister Uday Samant) त्यांनी सांगीतले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये राज्य अध्यक्षा डॉ. सुनिताताई मोडक, राज्य सचिव लक्ष्मणराव डोळस, प्रसिद्ध उद्योजक बाळाभाऊ पाठक, संपर्क प्रमुख सुजातालाई ढेरे, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. यु. एच. बलखंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप पवार यांनी केले. तर आभार गिनेश खेडकर यांनी मानले.