परभणीच्या पूर्णा रेल्वे स्थानकावर उघडकीस आली घटना अज्ञातावर गुन्हा दाखल!
परभणी (Bag Stolen) : काचिगुडा एक्सप्रेसने प्रवास करत असताना एका महिला प्रवाशाजवळील बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. सदर बॅगेत सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम होती. चोरी झाल्याचे पूर्णा स्थानकावर (Purna Station) आल्यानंतर लक्षात आले. अज्ञात चोरट्याने एकूण 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
एकूण 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास!
दामिनी राजपुरोहित यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यांनी आपल्या बर्थवर बॅग ठेवली होती. फिर्यादीला झोप लागल्यानंतर याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बॅग लंपास केली. सदर बॅगेत 62 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, साडे चौदा हजाराचा मोबाईल, 3 हजार रुपये रोख, 4 हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैजण व इतर साहित्य होते. चोरट्याने एकूण 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
प्रवाशाजवळील मोबाईल लंपास!
परभणी : रेल्वे प्रवासात प्रवाशाजवळील मोबाईल चोरीच्या घटना वाढला आहे. अजंठा एक्सप्रेसने प्रवास करत असताना अफसर खान यांच्या जवळील 75 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने (Thief) लंपास केला. तर दुसर्या एका घटनेत राज्यराणी एक्सप्रेसने प्रवास करत असताना बालाजी फुलवले यांच्या ताब्यातील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसात (Railway Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.