मनपा, नपाला निधी वितरित, बाळापूर मतदारसंघावर अन्याय का?
आमदार देशमुख यांचा प्रशासनाला खडा सवाल
आमदार देशमुख यांचा प्रशासनाला खडा सवाल
अकोला (Balapur Municipal) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २४ जुलै २०२४ रोजी नगरोत्थान योजनेंतर्गत बाळापूर नगर परिषदेसाठी मंजूर करण्यात आलेला निधी अद्यापही मिळाला नाही. निधी वाटपात भेदभाव करणारे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी २७ जानेवारीपर्यंत निधी वितरित न केल्यास २८ जानेवारीपासून त्यांच्या दालनात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी जिल्हा प्रशासनाला जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच (Balapur Municipal) नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रात विविध विकासकामे करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी निधी मंजूर निधी मिळाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत चर्चा करून निधी वाटपाला मंजुरी दिली जाते.
जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य जनतेची कामे व्हावीत या उद्देशातून निधी वाटपाला कधीही खोडा घातला नव्हता. ४ जुलै २०२४ रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नगरोत्थान योजनेंतर्गत अकोला महानगरपालिका तसेच पातूर, (Balapur Municipal) बाळापूर, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर नगरपरिषद व बार्शिटाकळी नगरपंचायतसाठी निधी वाटपाला मंजुरी देण्यात आली होती. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अजित कुंभार यांनी बाळापूर नगरपरिषद वगळता इतर सर्व नागरी स्वायत्त संस्थांसाठी निधी वितरित केला. निधी न मिळाल्यामुळे बाळापूर शहरातील विकासकामांना खीळ बसली असून, हा सर्वसामान्य जनतेवर अन्याय असल्याचे उद्धवसेनेचे आमदार तथा उपनेते नितीन देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.
निधी वितरणातील तांत्रिक बाबी तपासल्या जात असून, निधी वितरणात राहिलेल्या पातूर आणि बाळापूर नगर पालिकांपैकी पातूर नगर पालिकेला निधी वितरित करण्यात आला. उर्वरित (Balapur Municipal) बाळापूर नगर पालिकेच्या निधी वितरणातील तांत्रिक बाबी तपासल्या जात असून, हा निधीदेखील लवकरच वितरित करण्यात येईल. – अजित कुंभार, जिल्हाधिकारी
निधी वितरित करण्यात भेदभाव ! जिल्हा नियोजन समितीने २४
जुलै रोजीच्या बैठकीत निधी मंजुरीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर महापालिकेला २१ ऑगस्ट रोजी निधी वितरित करण्यात आला. ७ ऑक्टोबर रोजी अकोट, १४ ऑक्टोबर रोजी मूर्तिजापूर, १० डिसेंबर रोजी बार्शिटाकळी, ११ डिसेंबर २०२४ रोजी तेल्हारा व १५ जानेवारी २०२५ रोजी पातूर शहराला निधी देण्यात आला. परंतु, बाळापूर शहराचा निधी रखडल्याचे समोर आले आहे.
आमदार नितीन देशमुख यांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाचा इशारा
मी विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सरपणे बाळापूर नगर परिषदेसाठी निधी वितरित केला नाही. ही गंभीर बाब असून, यासंदर्भात शासनाकडे तक्रार करणार आहे. तसेच यासंदर्भात २८ जानेवारीपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात उपोषणाला बसणार आहे.
– नितीन देशमुख, आमदार






