औंढा नागनाथ (Banjara Samaj) : नांदेड ते छत्रपती संभाजी नगर मार्गावर औंढा नागनाथ जिंतूर टी पॉईंट येथे बंजारा समाजाच्या वतीने अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी व हैदराबाद गॅझेटनुसार (Banjara Samaj) बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावाया मागणीसाठी सकल बंजारा समाज बांधवांनी16 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी बारा ते दोन वाजे दरम्यान नांदेड ते छत्रपती संभाजी नगर जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंट येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करून मागण्याचे निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांना देण्यात आले.

यावेळी सर्ववाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या तीन तर्फा वाहनाच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या.या रास्ता रोकोत मुखेड विधानसभेचे आ.डॉ.तुषार राठोड, बंजारा समाजाचे नेते डॉ बी, डी ,चव्हाण, ॲड. ,संतोष राठोड, ऍड. पंजाब राठोड, सुनील राठोड, डॉ. मुकेश पवार, दिलीप राठोड डॉ. मोहन राठोड, भाऊसाहेब चव्हाण आदींसह जिल्हाभरातून बंजारा समाज बांधव या रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंदे, पोलीस निरीक्षक जी एस राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, दत्ता कानगुले,पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस,, संतोष पवार, अफसर पठाण,यशवंत ग्रुपपवार ,जमादार गजानन गिरी, सुभाष जैताडे, माधव सूर्यवंशी, रमेश मस्के यांनी बंदोबस्त ठेवला होता. (Banjara Samaj) रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर पोलीस यंत्रणेला एक तास वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले.मागील पाच दिवसापासून बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीप्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर वडचुना येथील उपोषणास बसलेले नामदेव राठोड यांचे आमरण उपोषण मान्यवरांच्या विनंतीवरून मागे घेण्यात आले.
नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन उपोषण थांबवण्यात आले. परंतु वेळप्रसंगी आरक्षण मिळण्यासाठी परत श्वास व श्वासाचा शेवट होईपर्यंत आपण परत बंजारा समाजासाठी आमरण उपोषण करणार असल्याचे नामदेव राठोड यांनी यावेळी जाहीर केले.यावेळी डॉ. बि डी चव्हाण यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. नामदेव राठोड यांनी (Banjara Samaj) उपोषण स्थगित केल्यामुळे प्रशासनाने मात्र एकदाचेसुटकेचा श्वास घेतला.




