किती दिवसात व कसा उड्डाणपूल होणार याबद्दल मात्र प्रवाशात संभ्रम
बासंबा (Basamba Flyover) : अकोला- हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर बासंबा फाटा या ठिकाणी विदर्भाला जोडणाऱ्या राज्य रस्त्यावर उड्डाणपूल न उभारल्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण गेले असून यामध्ये कित्येक जण जखमी झाले आहे. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला जाग आला असून (Basamba Flyover) उड्डाणपूल निर्मितीचा मुहूर्त 14 ऑगस्ट रोजी निघाल्याचे, दिसून येत असून जेसीबीच्या साह्याने कामाला सुरुवात केली आहे. मात्र किती दिवसात व कसा उड्डाणपूल होणार याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
अकोला हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग अतिजलद गतीने झाला असून हा मार्ग हिंगोली शहरातून न जाता बासंबा फाट्यावरून नांदेड बायपास क्रमांक 161 काढण्यात आला या राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजन शून्य कारभाराचा मोठा कळस (Basamba Flyover) बासंबा फाट्यावर दिसून आला याच फाट्यावरून पुसद हा विदर्भाला जोडणारा राज्य रस्ता क्रमांक 214 जातो. या रस्त्याने दररोज हजारो वाहनधारक आपला जीव मुठीत धरून गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रवास करीत आहे.
या ठिकाणी अनेक वेळा जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच परिवहन मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून हा फाटा अपघात प्रवनस्थळ म्हणून जाहीर केला होता तेव्हा बासंबा ग्रामस्थ व प्रवासी वर्गाबरोबर गावकऱ्यांनी अनेक वेळा लेखी व रस्ता रोको आंदोलन केल्याने गेल्या तीन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ठिकाणी वारंवार केलेली मागणी मान्य करून पुन्हा शासनाचे अंदाजे वीस कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
त्यानंतर या कामाला सुरुवात करण्याच्या मागण्या अनेक वेळा ग्रामस्थाबरोबर अधिकारी वर्गातून सुद्धा करण्यात आल्या शेवटी या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार हे नक्की झाले आणि 14 ऑगस्ट रोजी एका जेसीबीच्या साह्याने एका ठिकाणावर खोदकाम करून काम सुरू झाल्याचा मुहूर्त दाखवण्यात आला परंतु प्रत्यक्षात किती वर्षे आणि कशा पद्धतीचा उड्डाणपूल या ठिकाणी करण्यात येणार याबद्दल कोणत्याच प्रकारची माहिती किंवा फलक या ठिकाणी अद्याप न लावल्यामुळे प्रवासी वर्ग अजूनही संभ्रमात दिसून येत आहेत. दरम्यान अकोल्यापासून हैदराबाद पर्यंत अशा प्रकारे राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले.
त्यानंतर पाच वर्ष या ठिकाणी अनेक प्रवाशांनी जीवघेणा प्रवास केला यामध्ये अनेक अपघात होऊन कित्येक जनाचे प्राण सुद्धा गेले. परंतु राष्ट्रीय महामार्गा विभागाने या ठिकाणी नियोजन शून्य कारभार करून (Basamba Flyover) राष्ट्रीय महामार्ग काम चालू असतानाच पुल का उभारला नाही?व अशा नियोजन शून्य कारभार कसा झाला याबद्दल अनेक जाणकार प्रवासी वर्ग अजूनही संभ्रमात दिसून येतात.