परभणी (Parbhani) :- परभणी जिल्हा राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress)आलेल्या प्रत्येकाचा सन्मान केला जाणार आहे. तसेच शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक विभागाची बैठक लावली जाणार आहे. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवावा असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले.
शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक विभागाची बैठक लावली जाणार
येथील महात्मा फुले शाळेच्या मैदानावर झालेल्या अक्षय देशमुख, कृष्णा देशमुख व इतरांच्या पक्ष प्रवेश सोहळयात उपमुख्यमंत्री ना.पवार हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नवाब मलीक, आ.राजेश विटेकर, आ.विक्रम काळे, आ.राजेश नवघरे, प्रताप देशमुख, डॉ.अंकुश लाड, पंकज आंबेगावकर, भावनाताई नखाते, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, विठ्ठलराव सुर्यवंशी, सुरेश नागरे, नाना राऊत, विजय जामकर, अविनाश काळे आदिंची उपस्थिती होती. पुढे बोलतांना ना.पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा पक्ष असून सर्व जाती धर्मांना सोबत घेवून पदांची वाटचाल केली जात आहे. त्यामुळे पक्षात आलेल्या प्रत्येकाचा सन्मान केला जाणार असून त्यांना पश्चातापाची वेळ येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तुम्हाला बळ देण्याचे काम करतांना ग्रामीण व शहरी भागाचा विकास केला जाईल.
संपुर्ण राज्याचे प्रश्न मला माहित आहेत
तेव्हा विकास करतांना देखील मी शेतकर्यांच्या पाणी प्रश्न व शहरातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यसाठी काम करत असतो. मराठवाड्यातील शेतकर्यांना पाणी देण्यासाठी इतर नद्यांचे पाणी वळविण्याचा प्रयत्न चालु आहे. येणार्या अर्थसंकल्पात समाजाच्या प्रत्येक घटकांचे जीवनमान उंचवण्यासाठी वेगळी तरतुद केली जाणार आहे. मराठवाड्याचे राजकारण गढुळ झाले आहे. लाडकी बहिणींची योजना बंद पडणार नाही. अक्षय देशमुख यांनी शहराच्या समस्या मांडल्या त्या सोडविण्यासाठी मी मुंबईत बैठका लावून परभणीचे प्रश्न निश्चीतच सोडविणार अशी ग्वाही ना.पवार यांनी यावेळी दिली.