शाहू फुले आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशन अमरावतीचे,जिल्हा कचेरीत निदर्शने
अमरावती () : बेलोरा अमरावती विमानतळास (Belora Airport) डॉक्टर पंजाबराव देशमुख नाव देण्यात यावे विमानतळाच्या दर्शनी भागात (Dr. Punjabrao Deshmukh) डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पूर्ण कृती पुतळा बसविण्यात यावा यासह अन्य मागण्या घेऊन फुले शाहू आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशन अमरावती द्वारा डॉ. गणेश पाटील, माजी कुलगुरू, शाहू, फुले आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशन अमरावतीचे समन्वयक किशोर बोरकर, डॉ .बी.आर.देशमुख, अँड गजानन पुंडकर,अँड. पी. एस खडसे, डॉ . श्रीकांत देशमुख,भैय्या साहेब निचळ, प्राचार्य गोपीचंद मेश्राम, रामेश्वर अभ्यंकर, समीर जंवजाळ, प्रा.सुजाता झाडे, प्रा. प्रदिप दंदे, यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरी परिसरात निदर्शने देण्यात आली व आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
बेलोरा अमरावती विमानतळास डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव द्या – किशोर बोरकर
बेलोरा अमरावती (Belora Airport) विमानतळास डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) यांचे नाव देण्यात यावे यासाठी विविध सामाजिक संघटना गत चार ते पाच वर्षापासून मागणी करीत आहेत तसेच अमरावती जिल्हा परिषदेने व महापालिकेने सर्वानुमते ठरावही पारित करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी बेलोरा विमानतळास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव मिळालेच पाहिजे भाऊसाहेब देशमुखांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
13 जुलै 2019 रोजी बेलोरा विमानतळाच्या (Belora Airport) विस्तारीकरणाच्या प्रसंगी तत्कालीन आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेलोरा विमानतळास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे या मागण्यांचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे एप्रिल महिन्यात विमानतळ सुरू होणार असल्याने देशाचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर भाऊसाहेब देशमुख तसेच त्यांचा आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संविधान निर्मिती सदस्य म्हणून मोलाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. (Belora Airport) बेलोरा विमानतळ डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) यांचे नाव देण्यात यावे डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. बेलोरा या विमानतळावरून अमरावती मुंबई, पुणे व दिल्ली प्रवासी वाहतूक सुरू करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
आंदोलनात शाहू फुले आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनचे समन्वयक किशोर बोरकर, डॉ. बी आर देशमुख, डॉ. गणेश पाटील, अँड पी एस खडसे प्राचार्य गोपीचंद मेश्राम ,समीर जवंजाळ भैय्यासाहेब निचळ,अजय लेंढे,प्रा. अनिल देशमुख प्रा.डाॅ. सुजाता झाडे, राजाभाऊ चौधरी संकेत पाटील नरेशचंद्र काठोळे अंजली ठाकरे अश्विनी चौधरी, समाधान वानखडे, चंद्रकांत मोहिते ,संजय ठाकरे, रामेश्वर अभ्यंकर, सुधाकर तलवारे ,प्रदीप ददे, जगदीश गोवर्धन, हेमंत देशमुख, प्रदीप राऊत विजय शिंदे ऍडव्होकेट गजानन पुंडकर सुरेश खातोरे सुभाष देशमुख गजानन पुंडकर सुरेश खोटरे मोहन चौरे सुरेश आतकरे महेश देशमुख आशिष देशमुख मनीष पाटील अतुल देशमुख निलेश ठाकरे विलास ठाकरे रमेश रामटेके नरेश देशमुख किशोर वडनेरकर सुधाकर टाले रविंद्र शिरसाट संजय ठाकरे शितल देशमुख विजया देशमुख शिल्पा राऊत प्रकाश तायडे विलास दळवी प्रमोद कुचे विनोद देशमुख सुरेश दहिकर बुद्ध दास इंगोले लक्ष्मण वाघमारे राजेंद्र ठाकरे प्रशांत मेश्राम मनीषा देशमुख प्रशांत विघे भारत डोंगरे गजेंद्र पात्रे छाया पात्रे प्रकाश फाटे सलीम मिरावाले विविध राजकीय सामाजिक संघटना संस्थांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
भाऊसाहेबांच्या राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन विमानतळस नाव द्यावे- किशोर बोरकर
पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचा विकास व्हावा. म्हणून देशांतर्गत कृषक समाजाची स्थापना केली देशभरात भाऊसाहेबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर, संपूर्ण देशात विदेशात आहेत भाऊसाहेब देशमुख यांच्या राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन (Belora Airport) बेलोरा अमरावती विमानतळास डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) यांचे नाव देण्यात यावे अशी प्रतिक्रिया शाहू फुले आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक किशोर बोरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.