विकसित भारत राष्ट्रीय युवा संसद-२०२५’ मध्ये भक्तीची निवड
नांदगाव पेठ (Bhakti Deshmukh) : आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वशैलीने भुरळ घालणाऱ्या नांदगाव पेठची कन्या तथा महाराष्ट्राची लेक (Bhakti Deshmukh) भक्ती अरविंद देशमुख हिने केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय व नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित ‘विकसित भारत राष्ट्रीय युवा संसद-२०२५’ मध्ये आपले स्थान निश्चित केले असून १ ते ३ एप्रिल दरम्यान देशाच्या (Parliament) संसदेत भक्ती देशमुख (Bhakti Deshmukh) यांचा आवाज गुंजणार आहे. नांदगाव पेठ येथील श्रीरामचंद्र संस्थानचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध वक्ता प्राचार्य डाॅ. अरविंद देशमुख यांची कन्या कन्या असलेल्या (Bhakti Deshmukh) भक्तीने पुन्हा एकदा नांदगाव पेठ सह अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
दिल्लीच्या संसद भवनात १ ते ३ एप्रिल २०२५ दरम्यान ही युवा संसद संपन्न होणार आहे. या (Parliament) संसदेच्या प्राथमिक फेरीमध्ये देशभरातल्या ७५,००० हून अधिक तरुणांनी भाग घेतला. त्यानंतर हैदराबाद येथे जिल्हास्तरावर निवड झाले ल्या १५० तरूणांमध्ये भक्तीने प्रथम स्थान प्राप्त केले. तेलंगाणामधील १३ जिल्ह्यातील प्रथम दहा युवांनी राज्यस्तरीय संसदेत सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या संसदेत १३० युवकांमध्ये भक्ती प्रथम आली आणि आता ती राष्ट्रीय स्तरावर तेलंगाणा राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती सध्या हैदराबादच्या प्रतिष्ठित केंद्रीय विश्वविद्यालयामध्ये पीएचडी करते आहे.
केंद्र सरकारचा हा उपक्रम तरुणांना राजकारण आणि सार्वजनिक धोरणांशी जोडण्यासाठी आणि प्रशासन आणि राष्ट्र उभारणीत त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून काम करतो. १ ते ३ एप्रिल २०२५ दरम्यान होणाऱ्या या राष्ट्रीय फेरीत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अव्वल तीन आलेले स्पर्धक ‘एक देश एक निवडणूक’ या विषयावर आपले विचार मांडतील. ज्यामध्ये एकूण १०५ तरुणांचा सहभाग असेल.
दिल्लीच्या संसद भवनात सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ राजकारणी आणि विचारवंत यांच्यासमक्ष हे युवकांचे विचारमंथन होणार आहे. (Bhakti Deshmukh) भक्ती नांदगाव पेठ येथील श्रीरामचंद्र संस्थानचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध वक्ता प्राचार्य डाॅ. अरविंद देशमुख यांची कन्या असून लहान वयातच आपल्या सखोल अभ्यासाने आणि प्रभावी वक्तृत्वाने तिने लोकप्रियता प्राप्त केली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व नांदगाव पेठ वासियांनी तिचे अभिनंदन केले आहे. आणि तिच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या आहेत.