३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
भंडारा (Bhandara Zilha Parishad) : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहिर झाले. त्यात भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी आरक्षित असणार आहे. सरकारने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षणही जाहिर केले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा बार उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील २ ते अडीच वर्षापासून राज्यातील (Bhandara Zilha Parishad) जि.प.च्या निवडणूका रखडल्या होत्या. त्यामुळे या निवडणूका केव्हा होणार याची उत्सूकता सर्वांना लागली होती पण आता राज्य सरकारने दि.१२ सप्टेंबर २०२५ रोजी एका परिपत्रकाद्वारे राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर केले. त्यामुळे या निवडणूका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आरक्षण काढतांना २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे.
विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. सरकारच्या परिपत्रकानुसार (Bhandara Zilha Parishad) भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता राखीव झाले आहे. जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सभापतींचे आरक्षण जाहिर झाल्याने भंडारा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२७ करीता राजकीय पक्षांच्या हालचाली वाढणार असून जिल्हा परिषदेवर सत्ता काबिज करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांसह इतरही पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांत उत्सूकता कायम आहे.
यासोबतच आरक्षण जाहिर होताच सर्वच राजकीय पक्षातील संभाव्य उमेदवार उमेदवारी मिळविण्याकरीता नवनविन समिकरणे पाहवयास मिळणार आहेत.




