राजकुमार सस्तापुरे
(प्रदेश प्रवक्ता भारतीय किसान युनियन)
लातूर (Latur Municipal Corporation) : गेल्या तीस वर्षापासून दयानंद गेट येथे गुण्यागोविंदाने चालत असलेला शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार असलेला व ग्रहकांना ताजा व योग्य भावात भाजीपाला उपलब्ध करून देणारा हजारो बेरोजगार लोकांना रोजगार देणारा रयतू बाजार (Latur Municipal Corporation) महानगर पालिकेने अतिक्रमणाचे नाव पुढे करून हा बाजार मोडून काढण्याचे काम केले आहे. ही कारवाई अतिक्रमणाची नसून आर्थिक द्वेषापोटी केली आहे, असा आरोप भारतीय किसान युनियनचे प्रदेश प्रवक्ता राजकुमार सस्तापुरे यांनी केला.
लातूर शहरात वाहतुकीसाठी बार्शी रोड पर्यायी रस्ता असल्यामुळे दयानंद गेट ते संविधान चौक येथे वाहतुकीची कोंडी कधीही झालेली नाही. आज तेथे बाजार भरत नाही. सारा रस्ता सुमसान पडला आहे. कुणीही त्या रस्त्याचा वापर करताना दिसत नाही, हे वास्तव आहे असे सस्तापुरे यांनी म्हटले आहे. रयतू बाजारात रोज लाखो रुपयांची उलाढाल व्हायची. पण (Latur Municipal Corporation) महानगरपालिकेला एक रुपयाचा सुद्धा फायदा नव्हता. कर रूपानेही काहीही मिळत नव्हते.
त्यामुळेच निवळ आर्थिक द्वेषापोटी अतिकमणाचे नाव पुढे करून गाडे जप्त करून 2000 रुपये, काटा जप्त 500 रुपये असे वेगवेगळे दंड लावून पैसे जमा करण्याचा धंदा महानगरपालिकेने चालू केला आहे. पण यामुळे शेतकरी, व्यापारी ग्राहक या सर्वांचे आर्थिक नुकसान होत आहे. (Latur Municipal Corporation) महापालिकेच्या प्रशासनाने यांच्या जीवनाशी खेळू नये. या जागेला दुसरा पर्याय नाही त्यामुळे पर्यायी जागा नको, अशी भूमिका घेत हा विषय लवकर मिटवला नाही तर एक दिवस याचा उद्रेक झाल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा सस्तापुरे यांनी दिला आहे.