मृतदेह विमानाने भारतात आणला जाणार
हिंगोली (Youth death) : हिंगोली तालुक्यातील भटसावंगीतांडा येथील व्यक्तीचा दुबईतील जबेलअली भागात मृत्यू झाला आहे. घरातला कर्ता पुरुष गेल्याने त्याच्या आईच्या डोळ्यातून पाणी थांबेनासे झाले आहे. मुलाचा शेवटचा चेहरा पहावयास मिळाला पाहिजे अशी अपेक्षा गावकऱ्यांकडे व्यक्त केल्या नंतर गावकऱ्यांनी तातडीने (Youth death) मृतदेह भारतात आणण्याच्या हालचाली सुरु केल्या असून, त्यासाठी लागणारी कागदपत्रे शनिवारी १३ सप्टेंबरला दुबईतील भारतीय दुतवासाकडे पाठवली आहेत.
अल्प उत्पन्न असल्याने केंद्र शासनाकडून खर्च केला जाणार
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील भटसावंगीतांडा येथील दिलीप मंगू जाधव (४१) हा व्यक्ती पुर्वी गोवा येथे कामाला गेला होता. त्यानंतर तो दुबई येथे कामाला गेला एवढेच त्याच्या कुटुंबियांना माहिती आहे. भटसावंगी तांडा येथे त्याची आई, व भावजय असे दोघीच राहतात. घरी शेती नसल्याने दिलीप यांनी पाठविलेले पैसे तसेच रोजमजूरी करून ते उदरनिर्वाह करतात.
दोन दिवसांपुर्वी दिलीप यांचा दुबईत मृत्यू (Youth death) झाल्याची माहिती त्याच्या आईला देण्यात आली. मात्र हि घटना खरी आहे किंवा नाही याची शाहनिशा देखील त्यांना करता येत नव्हती. त्यानंतर त्यांनी सदर प्रकार संजय राठोड व गावकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने दिलीप याच्या सोबत काम करणाऱ्यांशी संपर्क साधून शाहनिशा केली. यामध्ये दिलीप यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, घरातील कर्तापुरुष गेल्यामुळे जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. मुलाचा मृत्यू (Youth death) झाल्याने त्याच्याआईच्या डोळ्यातील पाणी थांबेनासे झाले. माझ्या मुलाला अखेरचे पाहू द्या त्यासाठी काहीही करा अशी अपेक्षा गावकऱ्यांकडे व्यक्त केली. त्यानंतर राठोड यांनी तातडीने खासदार नागेश पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रकाराची माहिती दिली. खासदार पाटील यांना दुबईतील भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर (Youth death) मृतदेह आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.