भिवापूर (Bhivapur Accident) : अज्ञात वाहणाने दुचाकीला मारलेल्या धडकेत जिल्हा परिषद शाळेच्या (Teacher death) शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर (Bhivapur Accident) घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास (Bhivapur Police) भिवापूर पोलिस स्टेशन हद्दीतील भिवापूर – उमरेड महामार्गावरील रानमांगली फाट्यावर घडली.
विनोद राठोड 42 रा. उमरेड असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते काही कामानिमित्त आज सकाळी भिवापूरला आले होते. काम आटोपून दुचाकीने उमरेडला परत जात असताना वरील दुर्घटना घडली. समोरून भरधाव येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक (Bhivapur Accident) दिल्याचे समजते. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी राठोड यांना येथील (Bhivapur Hospital) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. राठोड हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. सोबतच ते उत्कृष्ट कबड्डीपटू सुद्धा होते. भिवापूर वरून दिड वर्षापूर्वी त्यांची उमरेड पंचायत समितीला बदली करण्यात आली होती. सध्या ते उमरेड तालुक्यातील सालई येथील शाळेत कार्यरत होते. त्यांच्या अकाली मृत्यूबद्दल येथे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Bhivapur Police) ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करीत आहेत.