रिसोड (Farmer suicide Case) : राज्यात आणि संपूर्ण देशभर सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सरकार आणि व्यवस्था सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या कडे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्ना कडे दुर्लक्ष करीत आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटना, किसान पुत्र चळवळ आणि किसान ब्रिगेड च्या वतीने अन्न त्याग आंदोलनाचे आयोजन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आले होते.
यावेळी अन्न त्याग आंदोलनामध्ये शेतकरी तथा भूमिपुत्र च्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. (Farmer suicide Case) शेतकऱ्याची पहिली व शासनाने दखल घेतलेली आत्महत्या स्वर्गीय साहेबरावजी करपे यांच्या सम्पूर्ण कुटुंबान केली होती. त्या घटनेला 39 वर्षे पूर्ण झाली. 19 मार्च 1986 ला पहिल्या शेतकरी आत्महत्या ची नोंद घेतली गेली. म्हणून 19 मार्च या दिवशी भूमिपुत्र कडून गेल्या सात वर्षापासून सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला जातो आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा चालू असतो.
अन्न त्याग कांदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक शेतकऱ्यांनी (Farmer suicide Case) आपल्या प्रतिक्रिया यावेळी नोंदवल्या. सकाळी 11 वाजता सुरू झालेले अन्न त्याग आंदोलन सायंकाळी चार ला उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते नींबू शरबत पाजून अन्न त्याग आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक रवींद्र चोपडे, विकास झुंगरे, वैजनाथ रंजवे, श्रीरंग नागरे, ड्रा.अमर दहीहंडी महावीर सिंग ठाकुर, रवी जाधव, किसान ब्रिगेडचे दिनकरराव बोडखे, सतीश मांदळे, शितल धांडे, शेषराव खरात, उद्धव भुतेकर, प्रकाश शिकारे, यांच्या सह अनेक शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.