नवीन वर्षात लागू होणार दर
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
चंद्रपूर (Chemical fertilizers) : रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना सुद्धा आता खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागणार आहे. शासनाची ही (Chemical fertilizers) कृती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरणार आहे.
शेतमालाचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा खाली आले. (Chemical fertilizers) हमीभावाने माल खरेदी करण्याची व्यवस्था नाही. परिणामी, शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागत आहे, परंतूखासगी व्यापारी शेतकऱ्यांना अक्षरशः लुटत आहेत. शेतीच्या भरवशावर शेतकरी घराचा खर्च, मुलीच्या लग्नात खर्च, आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च पूर्ण करू शकत नाही. अशातच, खत कंपन्यानी खताची भाववाढ जाहीर केली आहे. त्यानुसार DAP खत 1350 वरून 1590 रुपये, ट्रीपल सुपर फॉस्फेट 1300 वरून 1350 रुपये, 10-26-26 हा खत 1470 वरून 1725 रुपये व 12-32-16 हा खत 1470 वरून 1725 रुपये होणार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारी ही वाढ असून, शेतमालाचे भाव कमी होत असताना खतांची भाववाढ करून सरकार शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेत असल्याचे बोलल्या जात आहे.
शेतमालाच्या भावाचे काय?
शासनाकडून शेतमालाला हमीभाव जाहिर करण्यात आले. मात्र हमी खरेदी केंद्रावर घेऊन गेलेल्या शेतमालाला ओलाव्याचे कारण समोर करून परत पाठविण्यात आल्याचा अनुभव अनेक शेतकऱ्याना आला आहे. त्यामुळे ना इलाजास्तव शेतकऱ्याना (Chemical fertilizers) शेतमाल व्यापाऱ्याच्या घशात घालावा लागला. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगते खरे मात्र त्यांचेही दाखवायचे दात वेगळे अन खायचे दात वेगळेच असल्याचे शेतकऱ्यात बोलल्या जात आहे.