खापा-रामटेक मार्गावरील घटना
भंडारा (Bike Accident) : खापा-रामटेक मार्गावर काटेबाम्हणी गावाजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने मागेहून धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदर घटना दि.२६ मे रोजी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. मोरेश्वर यशवंत निमकर (५५) रा. धोप असे मृतकाचे नाव आहे. मोहाडी तालुक्यातील धोप येथील मोरेश्वर निमकर हा (Bike Accident) घटनेच्या दिवशी दुचाकी क्र.एम.एच.३६/एन.७९६५ या गाडीने तुमसर येथे गंज मार्केटमध्ये गेला होता.
काम आटोपून रात्री ८.३० वाजता दरम्यान दुचाकीने खापा-रामटेक मार्गाने स्वगावी जात असताना काटेबाम्हणी गावाजवळ ट्रॅक्टर क्र.एम.एच.३६/८८५८ उभा होता. ट्रॅक्टरचालकाने रात्रीच्या वेळी कोणतेही रिफ्लेक्टर िंकवा इंडिकेटर न लावता रस्त्यावर ट्रॅक्टर उभा केल्याने दुचाकीस्वारास ट्रॅक्टर दिसले नाही. परिणामी उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळली. त्यात (Bike Accident) दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मृत पावला. घटनेची नोंद तुमसर पोलिसात केली आहे.