दोघे गंभीर तर एक किरकोळ जखमी
नवेगाव/पाले येथील घटना
अड्याळ (Pauni Road Accident) : पवनी मार्गावरील नवेगाव/पाले येथे एका भरधाव कारने दुचाकीस चिरडले. त्यात दोघे गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला. सदर अपघात दि.३ जून २०२५ रोजी घडला. अपघाताची भीषणता भयावह असून दुचाकीला फरफटत नेऊन अक्षरश: चुराडा झाली. तर अपघातानंतर कार रस्त्याच्या कडेला उतरली. या (Pauni Road Accident) अपघातात दोघ जखमींच्या पायाचा चुराडा झाल्याचे सांगितले जात आहे.
जखमींमध्ये संविधान चंद्रशेखर गजघाटे (२५) रा.कोदुर्ली ता.पवनी, अमित बाबुराव लोखंडे (२६), निकीता बाबुराव मेश्राम (२२), दोन्ही रा.नागभिड, अशी जखमींची नावे असून जखमी संविधान व निकीता, हे गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी हे दुचाकी क्र.एमएच ३६ एपी ५७०६ या गाडीने पवनीकडून अड्याळकडे येत असतांना नवेगाव/पाले येथे विरुद्ध दिशेने जाणारी कार क्र.एमएच ३६ एएल ९००४ च्या चालकाने कार भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला चिरडले.
त्यात दुचाकीवरील तिघेही जण जखमी झाले. तर दुचाकी जवळपास ५० फूट अंतर फरफटत नेऊन कार रस्त्याखाली उतरली. यावेळी दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. तर संविधान गजघाटे व निकीता मेश्राम या जखमींच्या पायाचा चुराडा झाला. (Pauni Road Accident) अपघाताची माहिती अड्याळ पोलिसांना होताच ठाणेदार धनंजय पाटील यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून तिन्ही जखमींना उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे पाठविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या संविधान व निकीता यांना पुढील उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले.




