एकाच कंत्राटदाराचे घर भरण्यासाठी खटाटोप छोट्या कंत्राटदारांना उद्ध्वस्त करण्याचा डाव
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Akola Municipal Corporation) : अकोलेकरांनी भरभरून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना मतांचे दान देऊन महापालिकेवर एकहाती सत्ता दिली. त्याचा फायदा अकोलेकरांना होऊन शहराचा भरभक्कम विकास होईल, अशी अपेक्षा अकोलेकरांना होती. मात्र, या ठिकाणी अकोलेकरांचा पूर्णतः भ्रमनिरास झाला असून, (Municipal Corporation) महापालिकेत ‘क्लब’ टेंडरच्या नावाखाली बड्या कंत्राटदाराचे घर भरण्याचा खटाटोप सुरू आहे. तर छोट्या कंत्राटदारांना उद्ध्वस्त करण्याचा केवीलवाणा डाव सुरू असल्याने कंत्राटदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. क्लब टेंडरच्या माध्यमातून काही पदाधिकाऱ्यांच्या टक्केवारीची कोट्यवधींची उडाणे घेत असल्याचे बोलल्या जात आहे.
अकोलेकरांनी भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता दिली. या सत्तेचे फलित अकोलेकरांना हो किंवा न हो मात्र काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांना होत आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला नगरोत्थान निधी, नागरी दलित वस्ती व नागरी दलित्तेतर निधी प्राप्त होत आहे. याच निधीचे योग्य नियोजन करून छोट्या कंत्राटदारांपासून ते मोठ्या कंत्राटदारांना काम मिळणे हीच अपेक्षा आहे. पाच लाखांपासून ते एक कोटीपर्यंत सर्वच कंत्राटदारांना यापूर्वी (Municipal Corporation) महापालिकेत हाताना काम मिळत होते. मात्र, आता काही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या स्तरावरून प्रशासकीय मान्यता घेऊन ‘क्लब’ टेंडरचा मोठा डाव आखला आहे. यामुळे छोट्या कंत्राटदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे तर अकोलेकर व राजकीय वर्तुळात या विषयाची प्रचंड चर्चा सुरू आहे. सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावे म्हणून त्यांनी कंत्राटदाराचे लायसन्स काढले. त्यांच्या हाताला काम मिळेल व त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालेल, अशी अपेक्षा त्यांना होती.
परंतु, महापालिकेतील (Municipal Corporation) काही पदाधिकाऱ्यांनी एकाच कंत्राटदाराला ‘क्लब’ टेंडरच्या माध्यमातून लाभ होऊन टक्केवारीसाठी आटापिटा सुरू केला. अकोलेकरांनी भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता दिली. या सत्तेचे फलित अकोलेकरांना हो किंवा न हो मात्र काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांना होत आहे.
महापालिकेतील तत्कालीन पदाधिकाऱ्यांचा प्रताप कार्यकर्ते उरले सतरंजी उचलण्यापुरते !
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र प्रचंड मेहनत करून पक्षाला उंच शिखरावर पोहचून दिले आहे. तेच पक्षाचे कार्यकर्ते आता केवळ सतरंजी व खुर्च्य उचलण्यासाठी उरले असल्याची चर्चा रंगत आहे. त्यांच्या हाताला काम मिळावे, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून गाढा हाकावा हाच प्रयत्न पक्षातील नेत्यांनी करायला पाहिजे, मात्र मोजकेच पदाधिकारी स्वतःचे खिशे गरम करत असून पक्षातील कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत.
जनहित सर्वतोपरी ४० कोटींचे टेंडर, आयुक्तांवर राजकीय दबाव ! सुवर्ण जयंती नगरोत्थान निधी ४० कोटींचा प्राप्त झाला आहे. त्याचे नियोजन मनपाच्या चारही झोनस्तरावर प्रत्येकी दहा कोटी रूपये असे करण्यात आले आहे. त्यांचे ‘क्लब’ टेंडर करून काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे चांगभले करून घेतल्याचे बोलल्या जात आहे. हा सर्व प्रकार करण्यासाठी मनपा आयुक्तांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.